भारत आता अशा मोजक्या देशाच्या यादीत जाऊन बसला आहे की ज्या देशामध्ये जैवइंधनावरील विमान आकाशात भरारी घेतात. भारतातील ही उडान डेहराडून ते दिल्ली या शहारादरम्यान झाली आहे. Spice Jet ह्या विमान वाहतूक कंपनीने हे पहिलं जैवइंधन विमान उडवलं आहे. या आधी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन विकसित देशांनी हा कारनामा करून दाखवला आहे. विकसनशील देशामध्ये मात्र भारत आता पहिल्या स्थानी राहणार आहे.

● ऑस्ट्रेलियाने जानेवारी 2018 मध्ये Dreamliner Boeing 787-9 हे विमान अमेरिकेच्या लॉस अँजेलिस पासून ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न पर्यंत यशस्वीरीत्या पाठवून इतिहास घडवला. बायोइंधन वापरून प्रवास पूर्ण केलेली ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय विमान झेप होती. हा प्रवास पंधरा तासाचा होता आणि यात महुरीच्या बियापासून तयार केलेलं बायोइंधन (१०%) वापरलं गेलं होतं.

● २०११ साली, अमेरिकेच्या, अलास्का एअर लाईन या कंपनीच्या विमानाने वापलेल्या तेलासुन बनवलेलं बायोइंधन ५०% वापरून आकाशात झेप घेतली होती. २०१३ मध्ये सुद्धा न्यूयॉर्क आणि अम्सटरडॅम या शहारादरम्यान KLM ने बायोइंधन वापरून विमान उडवलं होतं.

● भारताच्या SpiceJet च्या Bombardier Q-400  या विमानाने मिक्स जैवइंधन वापरून डेहराडून ते दिल्ली या मार्गाने उड्डाण भरली आहे. ह्या यशस्वी उड्डाणाची घटना सोमवार २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली आहे.

काही अंदाजानुसार बायोइंधन वापरून आपण विमानांद्वारे होणारे 80% कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने 2050 पर्यंत 50% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं ध्येय ठेवलं आहे.

या वेळी केंद्रिय वाहतूक आणि परिवहनमंत्री श्री नितिन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान, SpiceJet विमान वाहतुक कंपनीचे अधिकारी आणि डीजीसीए चे आणखी बरेच अधिकारी घटनास्थळी हजर राहून टाळ्यांच्या गजरात आपण यशस्वी केलेल्या मोहिमेला अभिनंदन व्यक्त केले.