oneplus6t

भारतात नवी दिल्ली येथे OnePlus च्या नवीन अपडेटेड व्हर्जन चा स्मार्टफोन काल लाँच झाला. नवी दिल्ली मधील KDJW स्टेडियम मध्ये भारतीय वेळेनुसार काल रात्री 8:30 pm वाजता या स्मार्टफोनचा लोकार्पण सोहळा पार पडेल. काल रात्रीच्या इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा कंपनीकडून आपल्याला पाहायला मिळालं. OnePlus 6T चा जागतिक बाजारात लाँचिंग न्यूयॉर्क येथे सोमवारी करण्यात आले होते, काल मात्र भारतात याचे लाँच केले गेले आहे.

या इव्हेंटचा मूळ हेतू भारतीय बाजारात हा स्मार्टफोन कोणत्या किंमतीला विकला जाईल हे जाहीर करणे आहे. याआधी झालेल्या इव्हेंट मध्ये भारतीय किंमती जाहीर केल्या गेल्या नव्हत्या. 1 नोव्हेंबर पासून अमेझॉन इंडिया च्या वेबसाईटवर या स्मार्टफोनची विक्री केली जाईल. अमेझॉन व्यतिरिक्त हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल आउटलेट आणि OnePlus च्या औपचारिक वेबसाईटवरून केले जाईल. ग्राहकांना हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि मिरर ब्लॅक या कलर प्रकारात घेऊ शकतात. नवी दिल्लीत होणारे लाईव्ह स्ट्रीमिंग OnePlus च्या युट्युब चॅनेल वर आपल्याला पाहायला मिळेल.

OnePlus 6T च्या लाँच ऑफर बद्दल बोलायचं झालं तर, टेलिकॉम कंपनी जिओ ने 36 व्हाउचर स्वरूपात 5400 रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक ठेवले आहे. तसेच ICICI बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड होल्डर्स आणि सिटी बँक क्रेडिट कार्ड होल्डर्स OnePlus 6T च्या शॉपिंग वर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट चा फायदा मिळवू शकतील. तसेच अनेक प्रमुख बँकेकडून नो कॉस्ट EMI चा फायदाही ग्राहकांना घेता येणार आहे. तसेच अमेझॉन पे बॅलन्स चा वापर केलात तर तुम्हाला 1000 रु कॅश बॅक मिळेल, परंतु याची व्हॅलीडीटी 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यानच असेल.

यासारखे आणखी भरपूर ऑफर ग्राहकांना मिळतील पण या ऑफर बरोबरच खूप नियम असतात. ते नियम काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असतात. ते नियम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळतात. हा नवीन स्मार्टफोन बाजारातील इतर स्मार्टफोनशी स्पर्धा करू शकतो आणि इतरांना या फोनमुळे नुकसान ही होऊ शकते. लोकांमध्ये OnePlus च्या फोन्सचे खूप क्रेज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here