भारत सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने Remotely Piloted Aircraft किंवा Drones यांच्या साठी नवी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे, ती येत्या 1 December पासून संपूर्ण भारत भर लागू होईल आणि याचा उद्देश भारतीयांना भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नवीन संधी तयार करणं हा आहे.

  • ड्रोन म्हणजे नेमकं काय ?

तांत्रिक भाषेत, ड्रोन म्हणजे मानवरहीत हवाई वाहन ज्याला आपण Unmanned Aerial Vehical (UAV) म्हणतो. म्हणजेच हा एक aircraft आहे, कोणत्याही आकाराचा आणि कोणत्याही प्रकारचा, जो की कोणत्याही चालकाशिवाय आणि पॅसेंजर्सशीवाय स्वतः आकाशात उडतो.

  • ड्रोन चा उपयोग –

ज्या परिस्थिती मध्ये मानवी हवाई उड्डाण धोकादायक किंवा खूप अवघड असणार आहे अशा परिस्थितीत आपण ड्रोनचा वापर करू शकतो.

तसेच, नकाशे तयार करण्याकरिता, पाहणी करण्याकरिता, व्यावहारिक चित्रफितीकरणाकरिता, सुरक्षा यंत्रणेत, शेतकऱ्यांच्या पशुधन देखरेखी मध्ये याचा उपयोग होतो. सध्या तर ऍमेझॉन, पिझ्झा हट, या सारख्या कंपन्या विदेशात याचा वापर डिलीव्हरी देण्याकरता करत आहेत, सध्या भारतात मात्र यावर प्रतिबंध आहे. पण येत्या काळात भारत यांच्या साठी परवानगी देईल याची शक्यता आहे.

  • ड्रोन कोणकोण उडवू शकतो ?

ड्रोन्स च्या भारतातील गतीविधी ह्या परवाना परवानगी पद्धतीद्वारे नियंत्रणात ठेवल्या जातील. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणे तुमच्याकडे Unmanned Aircraft Operator Permit ड्रोन चालवण्याकरता असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या कारच्या नंबर प्रमाणे तुमच्या ड्रोनला ही एक Unique Identification Number (UIN) मिळणार आहे.

  • तुम्ही ड्रोन कोठेही आणि कधीही उडवू शकता का ?

तर नाही, तुम्ही ड्रोन तुमच्या मर्जीनुसार कोठेही उडवू शकत नाही. या भारत सरकारच्या नियमावलीनुसार तीन विभाग करण्यात आले आहेत. Red Zone, Yellow Zone आणि Green Zone.

या नियमावलीनुसार रात्री ड्रोन उडवण्याकरता प्रतिबंध आहे. चालकाच्या नजरेपलीकडे ड्रोन उडवण्यास प्रतिबंध आहे.

ड्रोन्स 400 ft उंचीपलीकडे उड्डाण भरू शकणार नाही.

हे ड्रोन्स धावत्या वाहनातून , धावत्या जहाजातून किंवा ट्रेन मधून चालवता येणार नाही.

Red zone – या झोन मध्ये ड्रोन्स पूर्णपणे प्रतिबंधित केले आहेत. याच्या मध्ये airports, आंतरराष्ट्रीय सिमारेषेजवळ, लष्करी तळाजवल, दिल्लीतील विजय चौकात, राज्यांतील राज्य मंत्रालया जवळ तुम्ही ड्रोन्स उडवू शकत नाही.

मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैद्राबाद या शहरातील ऐरपोर्टसच्या 5 किमी अंतरावर ड्रोन्स पूर्णपणे प्रतिबंधित आहेत. आणि देशातील अन्य ऐरपोर्टसच्या 3 किमी अंतरापर्यंत ड्रोन्स प्रतिबंधित आहेत.

आंतराष्ट्रीय सीमारेषेच्या आणि LOC, LAC आणि AGPL या सिमरेषयांच्या 25 किमी अंतर्गत ड्रोन्स प्रतिबंधित केले आहेत.

Yellow zone –

या झोन मध्ये तुम्हाला अगोदर Air Defense Clearance Certificate मिळवावे लागेल आणि त्या झोन मध्ये ड्रोन उडवण्याकरिता परवानगी घ्यावी लागेल. उदा. वन्यजीव अभियारण्य, टायगर रिझर्व्ह इत्यादी.

Green zone –

हा झोन मात्र अनियंत्रित आहे. अशा भागात तुम्ही मनसोक्त ड्रोन कोठेही उडवू शकता.

  • Digital Sky Platform –

ड्रोन उडवण्यापूर्वी ड्रोन चालकाला प्रत्येक ड्रोन उड्डाणा आधी या अँप्लिकेशन वर परवानगीसाठी विनंती अर्ज करावा लागेल. तुमची विनंती ताबडतोब स्वीकारली किंवा नाकारली जाईल, जर तुम्ही ग्रीन झोन मध्ये असाल तर.

प्रत्येक वेळा तुम्हाला डिजिटल परवानगी ड्रोनच्या उड्डाणाकरता घ्यावीच लागेल. जर Digital Sky Platform ने नकार दिला तर no-permission, no-take off पध्दतीने तुम्हाला ड्रोन उडवण्याकरिता प्रतिबंधित करतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here