भारतात ‘बँगलोर’ येथे पहिले क्रिप्टो करन्सी ATM सुरु करण्यात आले आहे. Virtual Currency Exchange, Unocoin यांच्यामार्फत हे पहिले ATM इंस्टॉल करण्यात आले आहे.

क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल करन्सी आहे, त्यात Bitcoin, Petro अशा पद्धतीच्या करन्सी आहेत.

क्रिप्टो करन्सी चे हे ATM, Kemp Fort Mall, बॅंगलोर येथे इंस्टॉल करण्यात आले आहे. या ATM वरून ग्राहकांना कमीतकमी 1000 रुपये डिपॉझिट किंवा विथड्रॉल असा व्यवहार करता येईल.

■ ATM कसे  काम करणार.?

  • या ATM चा उपयोग करण्यासाठी ग्राहकांना KYC करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कस्टमरला आपला user ID आणि SMS द्वारे आलेला OTP त्यात एंटर करावा लागेल.
  • योग्य ती माहिती भरून झाल्यास कस्टमरने आपले अकाउंट कन्फर्म करायचे आहे.
  • कस्टमरचे Unocoin अकाउंट फंड डिपॉझिट झाल्यानंतर लगेचच अकाउंट मधील शिल्लक रक्कम अपडेट होईल.
  • जमा केलेल्या करन्सी वरून तुम्हाला जवळपास 30 वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीची खरेदी करता येणार आहे.
  • या ATM मधून पैसे विथड्रॉल करण्याकरिता कस्टमरला अगोदर Unocoin च्या वेबसाईटवर जाऊन जेवढी रक्कम पाहिजे त्यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल. त्यांनतर कस्टमरला SMS द्वारे 12 अंकी रेफरल कोड येईल.
  • हा 12 अंकी रेफरल कोड मिळाल्यानंतर मग कस्टमर ATM ला भेट देऊन तो 12 अंकी कोड आणि OTP एंटर केल्यानंतरच पैसे काढता येणार आहेत.

अशाच प्रकारचे ATM मुंबई आणि दिल्ली येथे लवकरच इंस्टॉल करण्याचा Unocoin चा विचार सुरु आहे. बँगलोर येथील ATM हे सध्या तरी ऑपरेशनल नाही पण लवकरच येत्या एक-दोन दिवसात ऑपरेशनल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here