भारतातील IndiGo ही विमान परिवहन सेवा कंपनी, भारतातील पहिली कंपनी ठरली आहे, जिच्या कडे 200 विमान संख्या आहे. IndiGo कंपनीने नुकतंच नवीन विमान Airbus A320 Neo हे आपल्या फ्लीट मध्ये दाखल करून घेतलं आहे. हे नवीन विमान दिल्ली ते फ्रांसच्या Toulouse, शहरांदरम्यान उड्डाण भरणार आहे. या एअर लाईन कंपनीने 4 ऑगस्ट 2006 मध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यावेळी फक्त चार विमान त्यांच्याकडे होती. त्यांची पहिल उड्डाण दिल्ली ते इंफाळ दरम्यान झालं होतं. ते आजही कायम आहे. IndiGo ने 530 Airbus A320 आणि 50 ATR ची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 200 विमान आणि 10 ATR हे IndiGo ला भेटले आहेत आणि बाकी तयार होत आहेत.

DGCA च्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2018 मध्ये IndiGo कंपनीचा भारतातील विमान सेवेच्या हिस्सेपैकी 43% भाग हा एकट्या IndiGo चा होता. IndiGo ने ऑक्टोबर महिन्यात भारतातील अंतर्गत उड्डानात 53 लाख प्रवास्यांना सेवा दिली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येला घेऊन उडणारी IndiGo ही भारततील पहिली कंपनी ठरली आहे.

या एअर लाईन कंपनीने त्यांचा शेवटचा तिमाही तोटा हा (जुलै – सप्टेंबर) तीन वर्षांपूर्वी दाखवला होता. तो 652 कोटी रुपये इतका होता. या विरुद्ध याच कंपनीने 2018 च्या त्याच तिमाहित 551 कोटी रुपये फायदा झाला असल्याची मगिती जारी केली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती, कमजोर होत असलेला रुपया आणि विमान भाड्यात न करता येणारी वाढ एवढ्या समस्या असताना सुद्धा फायद्यात असणारी IndiGo ही एकमेव कंपनी आहे.

जुलै – सप्टेंबर 2018 चा रिझल्ट जाहीर करताना कंपनी म्हणते की, ” आमची बॅलन्स शीट ही खूप मजबूत आहे. आमच्याकडे एकूण कॅश 13,163 कोटी रुपये आहे आणि त्यापैकी 4,417 कोटी रुपये हे वापरण्यासाठी फ्री आहेत.” IndiGo कंपनीची भारतात स्थापना ही InterGlobe Enterprises चे राहुल अग्रवाल आणि राकेश गंगवाल यांनी केली आहे. IndiGo ही आता आपले पंख आंतरराष्ट्रीय बाजारात पसरवत आहे. IndiGo ही एअर इंडियाला विकत घेण्याची चर्चा मागे काही दिवसांपूर्वी चालू होती पण ती गोष्ट काही शक्य झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here