स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा ‘जिओ गिगाफायबरच्या’ नोंदणीला सुरुवात केली होती, हि सेवा दिवाळीपर्यंत सुरु होईल असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे. जिओ कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईल तेथून गिगाफायबर सेवेची सुरुवात होईल. ही सेवा सर्वप्रथम देशातील ११०० शहरांमध्ये सुरु होणार असून, गिगाफायबर लॉन्च होण्याच्या अगोदरच याच्या ऑफरची माहिती येत आहे.  तीन महिन्यांसाठी प्रिव्ह्यू (पूर्वावलोकन) ऑफर सोबत जिओ गिगाफायबर सेवा लॉन्च होऊ शकते. प्रिव्ह्यू ऑफरची सर्व माहिती कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार यूजरला गिगाफायबर प्रिव्ह्यू ऑफरमध्ये १०० एमबीपीएस एवढी स्पीड मिळणार आहे. यूजरला यामध्ये महिन्याभरासाठी १०० जीबी डेटा वापरता येईल. १०० जीबी डेटा वापरल्यानंतर यूजरला आणखी डेटाही फ्रीमध्ये मिळणार आहे. यामध्ये यूजरच्या अकाऊंटमध्ये ४० जीबी डेटा जोडला जाईल. याला डेटा टॉप-अपच्या माध्यमातून जोडले जाईल.

१०० जीबीचा डेटा संपल्यानंतर टॉप-अप करून ४० जीबी डेटा मिळेल आणि  यानंतरही यूजरला एका महिन्यात २५ वेळा टॉप-अप करून डेटा मिळू शकतो. असा दावा त्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच महिन्याला एकूण १.१ टीबी डेटा फ्री मिळेल. कंपनीने प्रिव्ह्यू ऑफरबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ग्राहकांना सुरुवातीला  जिओ गिगाफायबरच्या सेवेसाठी ४,५०० रुपये भरावे लागणार आहेत. यूजरला हे पैसे नंतर परत मिळणार आहेत. जिओ गिगाफायबरसोबत जिओ गिगा टीव्ही, स्मार्ट होम अशा  अनेक सुविधा फ्री देण्यात येणार आहेत. यूजरला महिन्याच्या वापरासाठी ४,५०० हजार रुपयांपेक्षा जास्त कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तीन महिन्यांची जिओची प्रिव्ह्यू ऑफर आहे. यूजरला जर ३ महिन्यांनंतर सेवा बंद करायची असेल तर त्याने भरलेले ४,५०० हजार रुपये परत मिळणार आहेत. पण सेट टॉप बॉक्स सुस्थितीत असेल तरच पूर्ण पैसे मिळतील, अशी अट जिओने घातली आहे.

जिओ गिगा फायबर बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता.