मागच्या वेळेस लाँच झालेला Xiaomi चा Redmi 6 Pro च्या यशानंतर कंपनीने त्याचा पुढचा अपग्रडेड व्हेरियंट लाँच करण्याची योजना आखली आहे. चीनची स्मार्टफोन बनवणारी Xiaomi कंपनी लवकरच हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या सर्टिफिकेशन वेबसाईटवर M1901F9T या नंबर ने एक नवा फोन रजिस्टर करण्यात आला आहे. खरं तर या नवीन फोनच्या नावाच्या बाबतीत अजून कोणतीच माहिती माध्यमांसमोर आलेली नाही. परंतु असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की हा फोन Redmi चा सिरीज फोन असून त्याचा नवीन व्हॅरियंट आहे, त्यामुळे त्याच नाव Redmi 7 Pro असण्याची दाट शक्यता आहे.

दाट शक्यता असण्याचं आणखी एक कारण म्हणजे गेल्याच आठवड्यात शॉओमी ला Redmi 7 सिरीज साठी 3C सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. या नवीन फोनच नाव काहीही असेल पण हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असले ज्यात वाटरड्रॉप नॉच आहे. लिस्टिंग नुसार फोनचा डिस्प्ले 5.84 इंच एवढा आहे आणि त्याच्या स्क्रीनला फुल HD+ डिस्प्ले देण्यात आलं आहे. तसेच त्याचा ओस्पेक्ट रेशो 19:9 असा आहे. याबरोबरच या फोन मध्ये 147.76×71.89×7.8 डायमेंशन असण्याची शक्यता आहे.

या फोनची बॅटरी 2900 mAh असून त्यात ड्यूअल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने पुर्णतः समृद्ध आहे. 3C लिस्टिंग नुसार नवीन शॉओमी स्मार्टफोन्स मध्ये 5V/2A चार्जिंग (10 वॅट) सपोर्ट देण्यात आला आहे. चीनमधल्या 3C सर्टिफिकेशन नुसार Redmi 7A, Redmi 7 आणि Redmi 7 Pro साठी सर्टिफिकेशन पूर्ण झालं आहे. आशा परिस्थितीत या फोन्सना लवकरच लाँच केलं जाऊ शकतं. कंपनी सध्या अनेक मोबाईल फोन्स वर काम करत आहे. त्यात एक मोबाईल फोन 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की त्याची किंमत जवळपास 20 हजार रुपये इतकी असेल.