फोनच्या मागच्या बाजूला कस्टमर स्वतःचं नाव देखील कोरू शकतात आणि…

तंत्रज्ञान क्षेत्रातील दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी LG ने एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय जो iPhone X पेक्षाही महाग आहे. हा कंपनीच्या सिग्नेचर सिरीजमधील स्मार्टफोन आहे. या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन कंपनीने गेल्याच वर्षी लॉन्च केला होता. आता कंपनीने LG V35 Signature edition 2018 हा फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत जवळपास १ लाख २३ हजार रुपये इतकी आहे, तर iPhone X च्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास १ लाख २ हजार रुपये आहे. जाणून घेऊया या फोनची किंमत एवढी जास्त का ठेवण्यात आली आहे.

LG Signature Edition 2018 हा फोन बनवताना Ziroconium ceramic चा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोनवर स्क्रॅच पडणार नाहीत असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय फोनच्या मागच्या बाजूला कस्टमर स्वतःचं नाव देखील कोरू शकतात. या स्मार्टफोनमध्ये 6 इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शनही आहे.

LG Signature Edition 2018 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर वर कार्यरत असेल. फोनमध्ये 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे, मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज तब्बल 2TB पर्यंत वाढवता येऊ शकतं. स्मार्टफोनमध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, 16 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम Quick चार्ज 3.0 आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3,300 mAh ची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, VoLTE, 3G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC आणि USB टाइप C हे फिचर आहेत.