Li-Fi हे Light Fidelity च संक्षिप्त रूप आहे. हे तंत्रज्ञान डेटा पाठवण्यासाठी light चा उपयोग करणार असून हे वायरलेस दूरसंचार तंत्रज्ञान आहे. अगोदर Li-Fi हा शब्द 2011 मध्ये जर्मनीचे वैज्ञानिक ‘Herald Haas’ यांच्याकडून ऐकायला मिळाला. Edinburgh येथे झालेल्या TED Global Talks मध्ये पहिल्यांदा Li-Fi या शब्दाचा वापर त्यांनी केला.

या तंत्रज्ञानामुळे लोकांना इंटरनेट light च्या मदतीने वापरता येणार आहे.सध्या Wi-Fi तंत्रज्ञानामध्ये Radio Signals चा वापर data transformation साठी केला जातो. आणि Li-Fi मध्ये light signals चा वापर केला जाणार आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल Radio Signals तर तरंग स्वरूपात असल्यामुळे data transfer होतो पण Li-Fi मध्ये data transfer कसा होणार, कारण light तर सतत चालू असणार आहे? तर याचं उत्तर पुढील प्रमाणे – Li-Fi तंत्रज्ञानात वापरत असलेला जो LED बल्ब आहे तो इतक्या जलध गतीनेे(एक सेकंदात लाखो वेळा) बंद चालू होणार आहे की तुम्ही ते निरीक्षणही करू शकणार नाही. तुम्हाला तो बल्ब चालूच आहे असं दिसणार. आणि या बंद-चालू होण्यामध्ये data binary numbers(1 & 0) मध्ये transfer केला जाईल.

या LED मध्ये signal processing technology असणार आहे आणि light द्वारे पाठवलेल्या डेटाला recieve करण्यासाठी photo-detector ची आवश्यकता असणार आहे.

LED बल्बच्या rapid dimming मधील लहान बदलाच receiver कडून electrical signal मध्ये रूपांतर केलं जाईल.

● Li-Fi चे फायदे –

◆ Li-Fi हे तंत्रज्ञान इंटरनेट मधील गोष्टीवर खूप मोठा परिणाम घडवून आणणार आहे कारण यामुळे इंटरनेट ची स्पीड Wi-Fi पेक्षा खूपच जास्त असणार आहे.

◆ याची रेंज कमी असल्यामुळे हे तंत्रज्ञान Wi-Fi पेक्षा जास्त सुरक्षित आहे.

◆ हे तंत्रज्ञान कसल्याही प्रकारचं प्रदूषण किंवा इतरांना इजा पोहचवणार नसल्यामुळे याला आपण Green Technology म्हणू शकतो.

◆ WiFi च्या तुलनेत Li-Fi हे तंत्रज्ञान कमी ऊर्जेवर चालणार आहे.

● Li-Fi तंत्रज्ञानातील त्रूटी –

◆ Li-Fi चा वापर करायचा असेल तर आपल्याला नेहमी light मधेच राहावं लागणार आहे. याची रेंज खूप मर्यादित असणार आहे. याचा आनंद घ्यायचाअसेल तर मोठ्या क्षमतेचे LED बल्ब सगळीकडे बसवण्याची आवश्यकता आहे.

◆ Li-Fi ह्या तंत्रज्ञानाला बाहेरच्या सूर्यप्रकाशामुळे अडथळा येऊ शकतो आणि त्याच्या कामात अडथळा येणार आहे.

◆ Li-Fi साठी Light बल्ब नेहमी चालू ठेवावे लागतील अगदी दिवसा सुद्धा. तुम्हाला जर light बंद करून एखादी movie किंवा online TV पाहता येणार नाही. कारण light बंद तर LiFi बंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here