ATM

भारतात आधीच ATM मशीन च्या कमतरतेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. पैसे काढण्यासाठी बँकेत भली मोठी रांग असते, त्यापासून वेळ वाचवण्यासाठी ATM ची सुविधा आली, परंतु लोकांना ATM मशीन शोधत भटकावे लागत होते आणि मशीन शोधले तर ते चालू आहे की नाही याचा काही नेम नसतो आणि जर ते चालू असेल तर त्यात पैसे राहतील की नाही, याची सुद्धा गॅरंटी नसते. आशा परिस्थिती आणखी आगीत तेल ओतल्याप्रमाणे एक बातमी पुढे आली आहे, ती म्हणजे भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त ATM येत्या मार्च बंद होणार असल्याची.

भारतातील 50 % पेक्षा जास्त Automated Teller Machine(ATM) मार्च 2019 पर्यंत बंद केले जाऊ शकतील, अशी सूचना Conferdartion of ATM Industry(CATMi) यांनी गुरुवारी दिली. बऱ्याच ATM चा वापर होत नाही, कारण ते चुकीच्या जागी बसवलेले असतात. तसेच अनेक ATM वापरण्या योग्य नाहीत.

सध्याच्या स्थितीत भारतात एकूण 238000 ATM मशीन आहेत, त्यापैकी 113000 ATM हे मार्च 2019 पर्यंत बंद होणार आहेत. त्यापैकी 100000 तर बंद पडलेले ATM च आहेत आणि आणखी 15000 ATM एवढी मोठी ATM ची संख्या आता वापर बाह्य होण्याची शक्यता आहे. ही माहिती CATMi चे स्पोक्सपर्सन यांनी सांगितली.

त्यांनी म्हटलं की CATMi चे हर पाऊल नवीन गाईडलाईन्स जी ATM च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपडेट साठी आहे, यावर आधारित आहेत. या पाऊलामुळे या इंडस्ट्री मधील रोजगार मोठ्या प्रमाणात नष्ट होणार. अर्थव्यवस्थेतील वित्त सेवेला या निर्णयामुळे मोठा धक्का पोहचेल.

या निर्णयामुळे लाखो लोकांना शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष करून ज्यांनी प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत अकाउंट काढले आहे, त्यांना जे Rupay ATM कार्ड दिले गेले आहे, त्यावरून ते आपली सबसिडी उचलत होते, त्यांना याचा जास्त त्रास होईल. नोटबंदी सारख्या वेळी जी गर्दी आपल्याला ATM समोर पाहायला मिळाली अशी नंतर पाहायला मिळू नये म्हणून देशातील आहेत तेवढे सर्व ATM वापरात असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here