चंद्रयान हे भारताचं चंद्रावरील पहिलं मिशन होय. २००८ साली ऑक्टोबर महिन्यात PSLV C11 च्या मदतीने ‘सतीश धवन स्पेस सेंटर’, श्रीहरिकोटा येथून भारतानं आंतरीक्ष यान चंद्रावर सोडलं. यावेळी डॉ. श्री जी. माधवन नायर हे ISRO चे अध्यक्ष होते. या  आपल्या बरोबर एकूण 11 उपकरणे नेली होती, त्यापैकी 5 उपकरणे ही ISRO ची होती आणि बाकी 6 उपकरणे ही वेगवेगळ्या देशांची होती.

NASA ने ऑगस्ट 2018 मध्ये एक रिपोर्ट पब्लिश केली, त्यात चंद्रावर पाणि आहे हे सिद्ध झालंय. तुम्हाला वाटेल यात काय नवीन, हे तर नेहमी ऐकतो आपण, पण तसे नाही, आतापर्यंत चंद्रावर पाणि असल्याच फक्त अंदाज आणि भाकिते होती आणि आता मात्र ही भाकिते आणि अंदाज खरे ठरले आहेत. हे सर्व प्रथम NASA ने जगाला सांगितले. NASA ने हे हि सांगितले आहे की या मिशन मध्ये चंद्रयानाची मदत झाली. ती मदत कशी झाली? NASA ला आपल्या अगोदर हि माहिती कशी कळली ? NASA ने ही माहिती एवढ्या गडबडीने का टाकली ? हे आपण पुढे पाहू.

चंद्रयानाने घेऊन गेलेल्या 6 परदेशीय उपकरणांमध्ये 2 उपकरणे ही अमेरिकेची होती. त्यापैकी नासाचं Moon Mineralogy Mapper (M3) हे एक होते आणि हे चंद्रयानाबरोबर चंद्रावर गेले होते. या M3 उपकरणाने चंद्रवरची प्रथम माहिती गोळा केली आणि त्या माहितीवरून नासाचे वैज्ञानिक हे सिद्ध करू शकले कि चंद्रावर पाणी आहे. याच्या माहितीनुसार चंद्राच्या दोन्ही ध्रुवावर मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत पाणी आहे कारण या ध्रुवावर सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने तेथे पाणि गोठलेल्या अवस्थेत आढळले. नासाला ही माहिती त्यांच्या M3 उपकरणामुळे कळली त्यामुळे नासाने ISRO च्या आधी पाणी असल्याचं निश्चित केलं. हे गोठलेलं पाणी मातीमध्ये मिक्स आहे, ते पृथ्वीवरच्या बर्फाळ प्रदेशप्रमाणे नाही, ते मातीमध्ये आहे. त्याला माती बाहेर काढणे खूप जिकरीचे काम आहे पण तरी देखील गोठलेलं का होईना पण पाणि आहे हे मात्र सिद्ध झाले .

ISRO ला हि माहिती काही महिने पूर्वीच कळली होती, पण पब्लिश करण्यासाठी, आम्ही त्या माहितीतील गुंतागुंत लवकर सोडवू शकलो नाही, असं ISRO चे माजी अध्यक्ष डॉ जी.माधवन नायर म्हणाले. ISRO च्या Moon Impact Probe (MIP) हे निश्चित केलं होतं पण त्या माहिती मध्ये विसंगतीचे गोंधळ होते त्यामुळे ISRO हि माहिती लवकर पब्लिश करू शकले नाही. नासाने ही माहिती आपल्या आधी पब्लिश करून श्रेय मिळवलं. पण यावरून हे ही लक्षात येते की भारतीय उपकरणं सुद्धा आता अमेरिकेच्या उपकरणाच्या तोडीस तोड म्हणून उभी आहेत. ISRO ने ही माहिती का पब्लिश केली नाही असं विचारलं असता ISRO चे माजी अध्यक्ष डॉ जी. माधवन नायर यांनी ही उपरयुक्त माहिती सांगितली. ISRO ही माहिती आपल्या आधी पब्लिश करणार या धास्तीने नासाने ही माहिती पब्लिश करण्यासाठी घाई केली, अशी शक्यता नाकारता येत नाही.

पण काही असो या शोधाने भारताच्या चंद्रयान मोहिमेच्या यशामध्ये आणखी एक भर टाकली आहे. अलीकडे ISRO गगनयान मोहीमेवर काम करत आहे, त्यात 2022 पर्यंत ISRO अंतराळात मानव पाठवण्याची तयारी करत आहे, ISRO च हे पहिलेच पाऊल असणार आहे या आधी ISRO ने अंतराळात मानवी मोहीम कधी केली नाही.