राजकीय पक्ष आपली हार आणि विजय साठी अनेकदा EVM वर प्रश्न उठवतात. त्या आरोपांना खारीज करण्यासाठी निवडणूक आयोगाने आतापर्यंत अनेक पाऊलं उचलली आहेत. त्यात VVPAD असो किंवा आता नवीन मोबाईल ऍप असो, त्या आरोपांना खोटं ठरवण्यासाठी काफी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी EVM मशीन मोबाईल अँप्लिकेशनला जोडलं जाईल, याची दाट शक्यता आहे. निडणूक आयोगाने यासाठी एक अँप्लिकेशन डेव्हलप केलं आहे, त्या अँप्लिकेशनद्वारे प्रत्येक EVM त्याचा नंबर वापरून मोबाईलशी लिंक करता येणार आहे.

कोणताही व्यक्ती आपल्या स्मार्टफोनद्वारे तो ठराविक नंबर असलेल्या EVM ची संपूर्ण स्थिती जाणून घेऊ शकेल. EVM कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे अशा प्रकारची सर्व माहिती मोबाईल वर मिळवता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या पाऊलामुळे EVM च्या संबंधीत कसल्याही प्रकारचा भ्रम राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार त्या मोबाईल अँप्लिकेशन द्वारे आपल्याला हे ही कळेल की EVM कोणत्या कंपनीने तयार केले आहे आणि ते कधी तयार केलं आहे, त्या EVM चा नंबर काय आहे, ते कोणत्या बुत वर कोणत्या कॅमेऱ्याच्या नजरेत आहे, त्यात एकूण किती वोट नोंदवले गेले आहेत, EVM किती जुनं आहे, ते ही लोकांना समजणार आहे, ही सर्व माहिती सर्वांना आपापल्या मोबाईल फोन वर कळेल.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणातील तयारी म्हणून बरेली येथील जनपद मुख्यालयात आणि अन्य मंडळात EVM च्या तपासण्या केल्या जात आहे. खराब झालेल्या जुन्या EVM ना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर केलं जाईल. मतदानास योग्य चालत असलेल्या EVM मशिन्सनाच ठेवण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील तपासणीसाठी इंजिअर्सची एक टीम तयार केली जाईल. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर EVM च्या पारदर्शकतेला तपासलं जाईल.

द्वितीय चरणात मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी जाण्याअगोदर कोणती बॅलेट युनिट कोणत्या कंट्रोल युनिट सोबत जाणार आहे, हे अचानकपणे ठरवण्यात येतं.

तिसऱ्या चरणात मतदान केंद्रावरील पिठासन अधिकारी सर्वांना EVM मध्ये शून्य मतं करून दाखवतील, त्यानंतरच पुढे मतदान केलं जाईल आणि ते रेकॉर्ड होईल.

चौथ्या चरणात मतदान झालेल्या EVM मशिन्सना मतमोजणी होण्यापूर्वी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलं जाईल. संपूर्ण सुरक्षा अंतर्गत त्या मशीन ठेवण्यात येतील आणि ह्या सर्व बाबी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या अँप्लिकेशन वर लाईव्ह दाखवलं जाईल किंवा दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here