रिलायन्स जिओने १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे बहुप्रतिक्षित Jio Phone 2 साठी फ्लॅशसेल उद्यापासून म्हणजेच 16 ऑगस्टपासून सुरू होत आहे. जिओ फोनच्या अथक यशानंतर आता अंबानी Jio Phone 2 बाजारात आणणार आहे.

JioPhone 2  मध्ये यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप ही या नव्या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. हा फोन 4जीनी युक्त आहे व तसेच  फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीने दावा  केला आहे.तसेच JioPhone 2 मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या ५०१ रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.

नोंदणी कशी कराल:–

उद्या दुपारी 12 वाजेपासून Jio.com संकेत स्थळावर किंवा माय जिओ अॅपवर सेलला सुरूवात होईल. तुम्हाला फोन खरेदी करण्यासाठी जिओ च्या संकेतस्थळावर गेल्यानंतर Get Now या पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि फोनसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक, पत्ता आदी गोष्टींची माहिती द्यावी लागेल. फोन खरेदी कऱण्यासाठी कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय यूजर्सना मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला नेट बॅंकिंग अथवा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अथवा ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. फोनची डिलीव्हरी केव्हापासून सुरू होणार याबाबत जिओकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.