NASA ने सूर्याच्या दिशेने आपलं स्वतःच एक अंतरीक्षयान पाठवलं आहे. 12 ऑगस्ट 2018 रोजी अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून ‘Delta-IV’ च्या मदतीनं या यानाने सूर्याच्या दिशेनं झेप घेतली. हे मानवतेचं पहिलं मिशन आहे जे सूर्याच्या एवढं जवळ जाणार आहे. या यानाचे नाव पार्कर सोलर प्रोब असे आहे आणि हे नासाचं पहिलं असं मिशन आहे ज्याला एका व्यक्तीच नाव दिलं गेलं आहे. हे नाव अमेरिकेचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. इउजीन पार्कर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अगोदर नासाने या मिशनच नाव ‘सोलार प्रोब प्लस’ असे ठेवले होते, नंतर ते बदलून ‘पार्कर सोलर प्रोब’ असे ठेवण्यात आले. इउजीन पार्कर यांनी दोन पुस्तक लिहिली आहेत, Cosmical Magnetic Field आणि Conversations on electric and Magnetic fields in the cosmos अशी त्यांची नावे आहेत.

आता या यान बद्दल आपण काही माहिती घेऊ, त्यात या यानाचे नेमके काय काम आहे ते पाहू. हे यान इंजिनीरिंगचा एक अद्भुत करिश्मा आहे आणि या यानाला एका Carbon composite पदार्थाने बनलेली ढाल देण्यात आली आहे जी या यानाची सूर्याच्या प्रखरतेपासून रक्षा करेल. हे यान सूर्याच्या भोवती गोलाकार कक्षेत नाही तर अंडाकृती कक्षेत परिक्रमन करणार आहे. हे यान दर काही वर्षांनी सूर्याच्या जवळ जाणार आहे, अभ्यास करणार आणि परत दूर जाऊन दुसऱ्या गृहापासून गती घेऊन परत सूर्याकडे जाणार आहे. या यानाची गती ही साधारणतः 200 किमी प्रति सेकंद असणार आहे जे कि आतापर्यंतचे सर्वात वेगवान यान आहे. हे यान नोव्हेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा सूर्याच्या जवळ जाणार आहे त्यानंतर ते डिसेंबर 2024 मध्येच सूर्याच्या सर्वात जवळ जाणार आहे.

या यानाची ध्येय-

● या यानातील मॅग्नेटिक क्षेत्राची रचना हि सूर्याच्या गतीशीलतेच्या अभ्यासासाठी आणि सूर्याजवळील मॅग्नेटिक क्षेत्र अभ्यासण्यासाठी वापरलं जाणार आहे.

● सौर वाऱ्यातील वेग आणि ऊर्जेचा प्रवाह जाणन्याकरीता याचा उपयोग होईल.

● धुलिय प्लाझ्मा जे आहे त्याचं रहस्य उलगडण्यासाठी आणि त्याचे सौर वाऱ्यावरील प्रभाव ओळखण्यासाठी याचा उपयोग होईल.

● सूर्याचे वातावरण हे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त उष्ण का आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुद्धा उपयोग होईल.

आपल्याला माहीत नसेल सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे 10,340 डिग्री फ़्रेन्हाईट आहे आणि तेच त्याच्या वातावरणातील तापमान पृष्ठभागाच्या तापमानाच्या 300 पट अधिक आहे.

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे यान आपल्याला मदत करणार आहे. आपली पृथ्वी, आपण, या सूर्यमालेतील तारे, ग्रह आपण सर्व सूर्याचा एक भाग आहोत, आपण सूर्यापासून तयार झालो आहोत. त्यामुळे सूर्याच्या अभ्यासाने आपण आपल्या निर्मितीच्या गूढ रहस्य सुद्धा सोडवू शकतो.