HAMMER – Preventing Earth and Asteroid Collision हे नासाचे महत्वाकांक्षी मिशन असून यात पृथ्वीसोबत ज्या अस्टेरॉईडची टक्कर होणार आहे त्याला त्याच्या मार्गावरून दूर करण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी नासाने हे मिशन लाँच केले आहे.

या अगोदर अशाच एका अस्टेरॉईडची टक्कर होऊन पृथ्वीवरून डायनॉसोर्सचे अस्तित्व संपुष्टात आले होते. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्टेरॉईड होते. याची टक्कर मेक्सिको जवळच्या Chicxulub cratar या जागेत झाली होती. पृथ्वीवर प्राप्त माहितीनुसार अनुक्रमे Dinosaur, Primates, Great Apes, Hominin Apes आणि सर्वात शेवटी आता Humans यांच अस्तित्व आहे.

Asteroid म्हणजे काय तर एक खडकाळ आणि काही वेळा धातुमय पदार्थ जो की एखाद्या लहान ग्रहापेक्षा सुद्धा लहान असतो.

Meteoroid हा अस्टेरॉईडचा छोटा भाग असतो. जेंव्हा तो अंतराळात असतो तेंव्हा त्याला meteoroid म्हणतात. जेंव्हा तो पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करत असतो तेंव्हा त्याला meteor म्हणतात आणि जर का तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहचला तर त्याला meteorite असे म्हणतात.

सर्वसाधारणपणे meteoroid पृथ्वीच्या वतावरणातून आरपार जाऊ शकत नाहीत कारण वातावरणात येताच घर्षणामुळे तो meteoroid पूर्णपणे जळून राख बनतो आणि यालाच आपण तुटलेली चांदणी असे म्हणतो. परंतु अस्टेरॉईड पृथ्वीच्या वातावरणातून आरपार जाऊ शकतात घर्षणामुळे अस्टेरॉईडच जास्त नुकसान होत नाही.

11 सप्टेंबर 1999 मध्ये नासाने एका अस्टेरॉईडचा वेध घेतला, तो पृथ्वीसोबतच सूर्याभोवती फिरत आहे. नासाने याला Bennu असे नाव दिले आहे. प्राचीन ईजिप्तच्या दंतकथेत Bennu हे नाव विनाशकारी देवाचे आहे. याबद्दल आणखी शोध घेतल्यानंतर नासाला हे लक्षात आले की Bennu हा पृथ्वीसोबत धडकू शकतो. याला bennu च्या अभ्यासासाठी नासाने 4 ऑक्टोबर 2016 रोजी OSIRIS-REx हे सॅटेलाईट लाँच केले आहे. Bennu अस्टेरॉईड 500 मी. रुंद असून त्याच वजन 79 billion किलोग्राम आहे. 25 सप्टेंबर 2135 मध्ये पृथ्वीला टक्कर देण्याच्या 2700 चान्सेस पैकी 1 वेळेस टक्कर होऊ शकते. याच्या अभ्यासानंतर अपल्यांकडे दोनच पर्याय उभे राहतात,

1) त्या अस्टेरॉईडला पृथ्वीच्या मार्गातून बाहेर काढणे, म्हणजे त्याचा course बदलणे.

2) त्याला नष्ट करणे.

यादोन्ही पर्यायासाठी आपल्याला nuclear power वापरावीच लागणार आहे. यासाठीच अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक spacecraft तयार केले आहे जे की त्या अस्टेरॉईडचा मार्ग बदलेल किंवा त्याला नष्ट करेल. त्याच spacecraft ला नासाने HAMMER असे नाव दिले आहे.

HAMMER म्हणजे Hyper velocity Asteroid Mitigation Mission For Emergency Response.

नासा हे spacecraft Delta-VI या अवजड रॉकेट ने लाँच करणार आहे. जर आपण 10 वर्ष आधी हे HAMMER मिशन चालू केले तर आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी या रॉकेटचे 34 ते 53 उड्डाण भरवावे लागतील, असं नासाचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here