जगातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी मोटोरोलानी आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला असून ,मोटो झेड ३ या नावाने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटो झेड ३ प्ले कंपनीचा हा फोन ऍडव्हान्स प्रीमियम व्हरजन आहे. या स्मार्टफोन मध्ये मोटो झेड सिरीजसच्या फोन प्रमाणे मोटो मोडचा वापर करता येऊ शकतो. मोटोरोलाने ५जी मोटो मोडे साठी लेनोवोसोबत करार केला आहे.

सध्या हा फोन अमेरिकेमध्ये लॉन्च केला असून याची किंमत ४८० डॉलर म्हणजे ३३ हजार रुपये इतकी आहे .१६ ऑगस्ट पासून ह्याची विक्री भारतात सुरु होणार आहे. भारतात मोटो झेड ३ किंमत किती असेल याचा खुलासा कंपनांनी केलेला नाही.
फोनमध्ये 6.01 इंच टचस्क्रीन डिस्प्ले असून यात 1080*2160 पिक्सल्ज़चे रेशुलाशन आहे. मोटोरोला मोटो जेड 3 हे 2.35 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित असून 4 जीबी रॅमसह उपलब्ध आहे.मायक्रो एसडी कार्डद्वारे 20000 जीबीपर्यंत विस्तारित करता येणारा फोन 64 जीबी अंतर्गत मेमरी आहे. मोटोरोला मोटो झेड 3 हा 12 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फी साठी 8 मेगापिक्सेल फ्रंट शूटर दिला आहे.मोटोरोला मोटो झेड ३ हा Android 8.1 वर आहे आणि त्याची बॅटरी क्षमता 3000 एमएएच ची आहे.