आपणास सर्वांना माहीत आहे अलीकडे व्हॉट्सऍप वर खोट्या बातम्या किंवा चुकीची माहिती पसरवून लोकांना प्रभावित करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लोकांसाठी व्हॉट्सअप हे अतिशय सुलभ आणि सहज माहिती मिळवण्यासाठीचं सोशल मीडिया स्थळ आहे.

परंतु अशा अफवांमुळे प्रशासनावर ताण पडत आहे. अशा घटनांना नियंत्रित करणे, ते होण्यापासून थांबवणे यांसाठी प्रशासनावरचा दबाव वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून भारतीय सरकारने व्हॉट्सअप कंपनीला असे सुचवले आहे की, खोट्या, चुकीच्या बातम्या किंवा अफवा या कोण तयार केल्या किंवा त्याची सुरुवात कोठून झाली हे कळेल असं काहीतरी बदल व्हॉट्सअप मध्ये करायला सांगितलं. परंतु व्हॉट्सअप कंपनीने यासाठी स्पष्ट नकार देत असं केल्यास व्हॉट्सअपच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उठतील असं सांगितलं.

अशा खोट्या बातम्या कोठून येतायत हे माहीत करायचं असेल तर व्हॉट्सअपला एंड-टू-एंड एनक्रिपशन मध्ये बदल करावा लागेल, आणि तसं जर आम्ही केलं तर संपूर्ण जगातील लोकांचा व्हॉट्सअपच्या सुरक्षिततेवरचा विश्वास उठेल, त्यामुळे व्हॉट्सअपला त्याचा मोठा फटका बसेल असं त्यांनी सांगितलं.

यावर व्हॉट्सअपने सध्या काय पर्याय शोधला आहे?

व्हॉट्सअपने या अगोदरच फेक आणि चुकीच्या बातम्यावर आळा घालण्यासाठी, अँप्लिकेशनवर जे फॉरवर्ड ऑप्शन आहे त्यात आधी एकाच वेळेस 250 ग्रुपवर फॉरवर्ड करू शकत होतो त्यात बदल करून एकाच वेळी 250 ऐवजी आता फक्त 5 ग्रुपवरच एकाच वेळी फॉरवर्ड करता येणार आहे, अशी सुविधा केली असून यामुळे फेक बातम्यांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होईल असं सांगितलं.

व्हॉट्सअपने जे काही केलं आहे ते अशा फेक बातम्याच्या सोर्स पर्यंत घेऊन जाण्यास सक्षम आणि पुरेशी अशी प्रणाली नाही, आणि यावर आळा घालण्यासाठी अजून सुद्धा व्हॉट्सप असमर्थ आहे, असं भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जर व्हॉट्सपने लवकरात लवकर यावर उपाय शोधला नाही तर भारतात आम्हाला व्हॉट्सएप्प बॅन करावे लागेल, असा इशारा भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

भारत सरकाने आणखी म्हटलं आहे की, ‘तुमच्याकडून आम्हाला संपूर्ण माहिती पहायला मिळावी अशी अपेक्षा नसून जेंव्हा केंव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल अशा वेळीच ती माहिती आम्हाला कळावी.’ असं सरकारने सांगितले.

भारतामध्ये सध्या व्हॉट्सअपचे प्रति महिना २०० मिलियन ऍक्टिव युजर आहेत, जर यदाकदाचित व्हॉट्सअपला भारतात बॅन करण्यात आले तर नक्कीच व्हॉट्सअप/फेसबुक कंपनीला आणि भारतात व्हॉट्सअप वापरणार्यांना खूप त्रास होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here