पॉड टॅक्सी ज्याला Personal Rapid Transit (PRT) असही म्हटलं जातं, ही आता भारतातही येत आहे. ही एक प्रगत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. या टॅक्सी पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहेत. लोकांना वाहतुकीत जास्त वेळ खर्च करावा लागत आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात येत आहे. या पॉड टॉक्सिनच्या मार्गात कोणताच अडथळा नसणार नाही. त्यामुळे विना अडथळ्यांचा प्रवास लोकांना करायला मिळणार आहे. केंद्रीय रोड वाहतूक आणि हायवे मंत्री श्री नितिन गडकरिजींचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

National Highway Authority of India(NHAI) या संस्थेनी दिल्ली ते गुरुग्राम या मार्गावर पॉड टॅक्सी मार्ग बनवण्याचे आदेश दिले आहेत. हा मार्ग 12.30 किमी अंतराचा असून दिल्ली- हरियाणा सीमेपासून गुरुग्राम मधल्या राजीव चौक पर्यंत हा मार्ग तयार होत आहे. पाच सदस्य समिती या प्रोजेक्ट च्या तांत्रिक बाबी आणि सुरक्षेच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आहे आहे. या समितीचे प्रमुख S.K. Dharmadhikari असणार आहेत. या प्रोजेक्ट साठी तब्बल 4000 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. American Society Of Civil Engineers ने घालून दिलेल्या American standards नुसार पॉड टॅक्सी काम करणार आहे.

◆ पॉड टॅक्सी पुर्णपणे स्वयंचलित असणार आहे म्हणजे चालकाशिवाय ही चालणार आहे, आणि बाकीच्या ट्रॅफिकचा याच्यावर काहीच परिणाम नसणार आहे.

◆ या टॅक्सी वर नियंत्रण command base मार्फत आणि मैदानावरून देखील ठेवण्यात येणार आहे. संपुर्ण मार्ग CCTV च्या नियंत्रणाखाली असणार आहे.

◆ या टॅक्सी मध्ये ध्वनी आणि दृश्य रुपात सूचना देण्यात येणार आहेत.

◆ या टॅक्सी मध्ये जास्तीत जास्त एकावेळी 5-6 व्यक्ती बसू शकतील.

◆ या टॅक्सी military grade wireless technology च्या मदतीने काम करणार आहेत.

◆ या टॅक्सींच नेटवर्क मध्ये लोकांसाठी पुष्कळ स्टेशन आणि लोकांना चढण्या-उतरण्यासाठी स्टॉप असणार आहेत. या टॉक्सिची स्पीड 60 कमी प्रति तास असणार आहे.

◆ या टॉक्सिना चालण्यासाठी इंधनाची आवशक्यता नसणार आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासाठी यांचा हातभार लागणार आहे.

● पॉड टॅक्सीचा इतिहास –

◆ अत्याधुनिक Personal Rapid Transit या संकल्पनेची सुरुवात Donn Fichter यांनी 1953 मध्ये मांडली होती. ते एक शहर वाहतूक नियोजक होते.

◆ 1967 मध्ये फ्रान्समधील ‘Aerospace Giant Matra in Paris’ यांनी Aramis Project नावाने प्रायोगिक तत्वावर याला सुरुवात केली होती. परंतु हा प्रोजेक्ट fail गेल्यामुळे 1987 मध्ये याला बंद करण्यात आले.

◆ 1970-1978 याकाळात जपानने ‘Computer Controlled Vehicle System’ पूर्णस्वरूपात चालू केले होते. यावेळी 84 वाहने 60 किमी प्रतितास यावेगाने 4.8 किमी guide way वर चालत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here