Sriharikota: ISRO's PSLV-C38 at the first launch pad in Sriharikota on Thursday, a day before launching earth observation satellite Cartosat-2 Series along with 30 co-passenger satellites of various countries. PTI Photo / ISRO(PTI6_22_2017_000070B)

PSLV-C42 हा आज दोन महत्वाचे सॅटेलाईट घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यात NovaSAR आणि S1-4 या सॅटेलाईटचा समावेश आहे. हे दोन्ही पृथ्वी निरीक्षण (Earth Observation) सॅटेलाईट आहेत.

16 सप्टेंबर रोजी रात्री 10:07 pm वाजता हे उड्डाण घेणार आहे.

  • 33 तासांचा काऊंटडाउन 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1:08 pm वाजता सुरू झाला. या दोन्ही पृथ्वी निरीक्षण सॅटेलाईट साठी हे उड्डाण महत्वाचं आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजे ISRO च्या विश्वासू अग्निक्षेपकाच्या, PSLV-C42 च्या मदतीने NovaSAR आणि S1-4 या दोन्ही मिळून 800 किग्रॅ. वजनाच्या सॅटेलाईटचं प्रक्षेपण होणार आहे.
  • दोन्ही सॅटेलाईट हे विदेशी असून यांचा पृथ्वीच्या मॅपिंग साठी आणि पूर आणि दुर्घटना व्यवस्थापनात वापर होणार आहे. हे दोन्ही सॅटेलाईट Sun synchronous कक्षेत 583 किमी अंतरावर अंतराळात भ्रमण करत जातील. हे सॅटेलाईट Surrey Satellite Technologies Limited, United Kingdom यांनी तयार केले आहेत.
  • ISRO ची ही मोहीम पूर्णपणे व्यावसायिक असून, UK च्या कंपनी मध्ये आणि ISRO च्या व्यावसायिक भागातील Antrix Corporation limited, यांच्यामधील अरेंजमेंट आहे. ISRO ची ही यावर्षातील तिसरी अंतरिक्ष झेप असणार आहे. याअगोदर जानेवारी मध्ये ISRO ने PSLV-C40 च्या मदतीने हवामान निरीक्षण सॅटेलाईट Cartosat-2 च प्रक्षेपण झालं होतं आणि एप्रिल मध्ये PSLV-C41 च्या मदतीने navigation सॅटेलाईट IRNSS-1I च यशस्वी प्रक्षेपण झालं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here