ओप्पो चा सबब्रँड असलेला Realme फोन कमीत दामात चांगल्या सुविधा देऊन ग्राहकांचे मने जिंकत आहे. रिअलमी यांनी आपला Realme 2 pro हा स्मार्टफोन काल लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या बाजारात ३ प्रकारात आणि तीन कलर ऑपशन मध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन रेडमी च्या मिड रेंज आणि नोकिया ६.१ प्लस ला टक्कर देण्यासाठी बाजारात आणला आहे. चला मग पाहूया अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या ह्या फोन बद्दल खास आहेत.

डिस्प्ले :-

Realme २ Pro या स्मार्टफोन मध्ये सुपर-व्ह्यू ६.३ इंचची dewdrop स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीन चा आस्पेक्ट रेशो ५:९ देण्यात आला आहे. या स्मार्टफोन चा dewdrop विवो वि ११ प्रो शी मिळता जुळता आहे.

डिझाइन :-

डिझाइन च्या बाबतीत सांगायचे झाले तर, हा स्मार्टफोन Realme सिरीज चा सर्वात दमदार स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोन ची डिझाइन, कलर ऑपशन आणि बनावट Real सिरीजच्या अन्य स्मार्टफोन पेक्षा खूपच वेगळी आहे. या फोन ला dewdrop नॉच फिचर आणि क्रिस्टल बॅक कव्हर सोबत लाँच केला गेला आहे. फोनची डिझाइन आणि बनावट या किंमतीच्या अन्य स्मार्टफोन पेक्षा प्रीमियम आहे. हा स्मार्टफोन हीट रेसिस्टन्स, इम्पॅक्ट रेसिस्टन्स, हाय कलर Saturation आणि ट्रान्स्परन्ट ग्लास डिझाइन सोबत लाँच करण्यात आला आहे.

परफॉर्मन्स :-

फोनच्या परफॉर्मन्स बाबतीत सांगायचे झाले तर, यामध्ये नोकिया ६.१ प्लस प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० AIE प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड ओरिओ ८.० आणि कलर ओस ५.२ युझर इंटरफेस वर रन होतो. फोन ३ वेगवेगळ्या रॅमच्या प्रकारात म्हणजेच ४GB, ६GB आणि ८GB मध्ये उपलब्ध केले आहेत. ४GB आणि ६GB रॅम सोबत ६४GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे, तर ८GB रॅम सोबत २५६ GB स्टोरेज देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मल्टिटास्किंग आणि गेमप्ले खूप आरामदायक आहे. ८GB रॅमचा व्हेरिएंट अन्य मेमरी व्हेरिएंट पेक्षा ४०% कमी पॉवरचा वापर करतो.

यामध्ये PUBG आणि AOV सारखे गेम खेळण्यासाठी गेम स्पेस फंकशन देण्यात आला आहे. याचा गेम स्पेस फंकशन Oneplus ६ आणि Vivo Nex प्रमाणे देण्यात आला आहे. यामुळे गेमप्रेमीसाठी हा फोन एक अप्रतिम स्मार्टफोन होऊ शकतो.

कॅमेरा :-

Realme २ Pro मध्ये १६ मेगापिक्सल चा AI ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरामध्ये २ कॅमेरा असतील त्यामध्ये पहिला कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा Sony IMX३९८ सेन्सर सोबत असेल व दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा असेल जो कि इमेज कॅपचर करण्यासाठी देण्यात आला आहे. सेंकंडरी कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा असेल, जो स्मार्ट एक्सपोजर आणि कॉन्ट्रास्ट Saturation रेशो सोबत दिला गेला आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्ही 4K विडिओ पण कैद करू शकता.

बॅटरी :-

या फोनची बॅटरी क्षमता हि ३५०० mAh ची देण्यात अली आहे. जी कि USB टाईप-A ला सपोर्ट करतो. 

किंमत :-

या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारपेठामध्ये १३,९९० रुपया पासून असेल जी ४GB/६४GB व्हेरिएंटची असेल, तर ६GB/६४GB व्हेरिएंट ची किंमत हि १५,९९० रूपये इतकी असेल आणि ८GB/१२८GB सस्टोरेज ची किंमत १७,९९० रुपये इतकी असेल.

जर तुम्ही २०,००० च्या आत उत्तम फोनचा शोध करीत असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here