सध्याचा घडीला स्मार्टफोन हि प्रत्येकाची गरज झाली आहे, आणि स्मार्टफोन म्हणलं कि त्याची बॅटरीही अली कारण स्मार्टफोन हा नवा असो कि जुना बॅटरी शिवाय कोणताही फोन हा काहीही कामाचा नसतो, त्यामुळे स्मार्टफोन ची बॅटरी व्यवस्तिथपणे काम करणे खूप आवश्यक असते. पण आपण कधीकधी नकळत अशाकाही चुका करून बसतो ज्यामुळे आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी खराब होऊ शकते.

त्यामुळे आपल्याला काही चुका करणे टाळायला पाहिजे.

रात्रभर फोन चार्ज करणे:

अनेकांना आपला फोन रात्रभर चार्ज करण्याची सवय असते, कदाचित त्यांना असे वाटत असावे कि त्यामुळे फोन हा जास्त चार्ज होतो, तर असे नाही ह्याचा अतिशय वाईट परिणाम हा तुमच्या बॅटरीवर होतो. अतीवेळ बॅटरी चार्ज केल्याने ती लवकर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे खूप वेळ फोन चार्जिंगवर लावू नये.

ओव्हर हीटिंग:

जर तुमचा फोन हा खूप गरम होत असेल तर त्याचाहि वाईट परिणाम फोनच्या बॅटरी वर होतो. त्यामुळे फोन ला जास्त गरम होऊ देऊ नये.

गेम खेळताना किंवा फोनवर खूपवेळ काम करत असताना जर असे लक्षात आले कि फोन खूप गरम होतो आहे तर लगेच सर्व फंक्शन बंद करून फोनला बंद करून ठेवावे.

अपडेट न करणे:

जर तुम्ही तुमच्या फोन अँप्लिकेशन सॉफ्टवेअरला वेळोवेळी अपडेट करत नसाल तर तुमच्या फोन मध्ये हॅकर्स किंवा वायरस अटॅक होऊ शकतो. वायरस बग मुळे फोनची बॅटरी गरम होऊ लागते आणि त्याचा परिणाम बॅटरी च्या क्वालिटीवर होतो. त्यामुळे तुमचा फोन वेळोवेळी अपडेट करत जा.

फोन पूर्णपणे डिस्चार्ज होणे:

कुठल्याही फोनच्या चांगल्या बॅटरी लाइफ साठी कधीही त्याला पूर्णपने डिस्चार्ज होऊ देऊ नका. वेळोवेळी फोन ला चार्ज करत राहा. कारण फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याने त्याचा परिणाम फोनच्या बॅटरी वर होतो, म्हणून १५% चार्जिंग शिल्लक असताना फोन चार्जिंगवर लावा त्याची डिस्चार्ज होण्याची वाट पाहू नका.

बॅकग्राऊंड मध्ये चालू असलेले अप्लिकेशन:

एकावेळी आपण फोन मध्ये वेगवेगळे अप्लिकेशन वापरतो आणि ते आपण पूर्णपणे बंद न करता फोन लॉक करतो किंवा फोनवर दुसरंच काही करत बसतो. ह्यावेळी ते अप्लिकेशन बॅकग्राऊंड मध्ये चालूच असतात. जेंव्हा आपण ते अप्लिकेशन प्रत्यक्षात वापरात नसतो तरीदेखील ते फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये सुरूच असते.

ह्यामुळे तुमचा फोन बंद जरी असला तरी त्याची बॅटरी हि खर्च होते असते. त्यामुळे फोन मधील कुठलेही अप्लिकेशन वापरून झाल्यावर ते पूर्णपणे बंद झाले कि नाही हेही एकदा तपासून पहा.

फोन चार्जिंग वेळी असताना काय करू नये:

जर तुम्ही फोन चार्जिंग वर लावला असेल तर त्यावेळी फोन वर गेम खेळू नये. तसेच फोन चार्जिंगवर असताना त्यावर बोलणेही टाळावे, कारण हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे फोन चार्जे होत असताना तो कुठल्याही प्रकारे वापरू नये. नाहीतर तुमची बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

लोकल चार्जरचा वापर टाळावा:

जर तुम्हला तुमच्या फोनची बॅटरी चांगली चालवी असे वाटत असेल तर त्याला नेहमी प्रमाणीत कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करा.

वरील टिप्स चा वापर व फोन ची हवी तशी काळजी घेतल्यास तुमच्या फोन ची बॅटरी लाईफ नक्की सुधारू शकते.