सूत्रांच्या माहितीनुसार असं कळतंय की सॅमसंग च्या फोल्डएबल फोन मध्ये असू शकतात दोन बॅटरीज आणि त्यांची एकूण कॅपॅसिटी 6000 mAh एवढी आहे. असं सांगण्यात येत आहे की, सॅमसंगच्या त्या फोनची किंमत 1,30,000 एवढी असणार आहे.

सॅमसंग त्यांचा पहिला फोल्डएबल स्मार्टफोन लवकरच बाजारात आणण्याची शक्यता आहे. अनेक रिपोर्ट्स यावर लिहितायत. सर्वांचं लक्ष या स्मार्टफोन कडे लागलं आहे. ते कसं असेल, त्यात काय काय फीचर्स असतील आणि ते कसं काम करेल याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. LetsGoDigital यांच्या रिपोर्ट नुसार सॅमसंगच्या या फोनच नाव Galaxy F असू शकतं. ज्यात F चा अर्थ Fold असा असेल. यात दोन वेगवेगळ्या बॅटरीज बसवण्यात आल्या आहेत. या रिपोर्ट मध्ये या दोन्ही बॅटरीज मिळून त्यांची कॅपॅसिटी 6000 mAh आहे.

सर्वसाधारणतः एवढ्या कॅपॅसिटीचा गॅजेट हा टॅबलेट असतो. स्मार्टफोन मध्ये एवढी जास्त कॅपॅसिटी असलेला फोन अजून तरी आला नाही. यातील दोन वेगवेगळ्या बॅटरीज दोन डिस्प्लेला पावर सप्लाय करतील. या स्मार्टफोन मधील कॅमेऱ्याचा विचार केला तर यातील रिअर कॅमेरा हा ड्यूअल असेल आणि ते 12- 12 मेगापिक्सेल असतील. तसेच त्याला फ्रंट कॅमेरा ही असेल आणि तो 8 मेगापिक्सेलचा असेल.

CGS-CIBM चे रिसर्च ऍनलिस्ट जून लिम यांच्यानुसार सांगण्यात आलं आहे की, ” सप्लायर्स कडून या माहितीची पुष्टी करण्यात आली आहे. ” सॅमसंगच्या या फोनमध्ये Exnoys 9820 चा 855 क्वालकोम प्रोसेसर असू शकतो. या फोनचा रॅम 8GB असू शकतो तसेच इंटर्नल स्टोरेज 128 GB असू शकतो. रिपोर्ट्स नुसार या फोन मध्ये एकापेक्षा जास्त स्टोरेज ऑप्शन असू शकतात।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here