सॅमसंग या जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनीने आपल्या गॅलक्सी A सिरीज मधल्या नवीन फोनच्या लाँचची घोषणा केली असून त्याचं नाव Samsung Galaxy A7 असं आहे. गुरुवारी दक्षिण कोरिया येथे झालेल्या समारंभात हा नवीन फोन जगापुढे आला. या फोनच असं वैशिष्ट्य आहे की याला मागच्या बाजूला तब्बल तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

तीन कॅमेरे असलेला हा सॅमसंगचा पहिलाच फोन आहे.

गेल्याच आठवड्यात Samsung Galaxy J4+ आणि J6+ या नवीन फोनच्या लाँचची घोषणा करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत हे फोन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलक्सी A7 मोबाईल फोनची किंमत अजून जाहीर केली गेली नाही. युरोपियन बाजारपेठ आणि आशियाई बाजारपेठ लक्षात घेऊनच लक्षात ठेवूनच याची किंमत ठरवली जाईल, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

Samsung Galaxy A7 चे फीचर्स –

 • या फोनची स्क्रीन ही 6-inch full-HD असून त्यात AMOLED infinity(1080×2280 pixels) display आहे.
 • Dolby atmos ऑडिओ टेक्नॉलॉजी आहे.
 • मागच्या तीन पैकी एक 24 megapixel auto-focus कॅमेरा आहे, दुसरा 8 megapixel wide sensor कॅमेरा आहे आणि तिसरा 5 megapixel depth sensor कॅमेरा आहे.
 • सेल्फी साठी म्हणजे फ्रंट कॅमेरा हा सुद्धा 24 megapixel कॅमेरा आहे.
 • dual-sim Samsung mobile
 • Android version 8.0 Oreo out-of-the box
 • या फोनमध्ये unnamed Octa core 2.2 GHz प्रोसेसर आहे.
 • या फोनमध्ये 4 GB /6 GB RAM असलेले दोन मॉडेल असणार आहेत आणि त्यात अनुक्रमे 64 GB / 124 GB अंतर्गत स्टोरेज असणार आहे.
 • 512 GB पर्यंत micro-SD कार्ड वापरून स्टोरेज वाढवता पण येणार आहे.
 • Battery हि 3300 mAh ची आहे.
 • side-mounted finger print sensor.

“सॅमसंग आपल्या ग्राहकांना नवीन शोध झालेले फोन्स पुरवण्यासाठी तत्पर आहे. ग्राहक कोण आहेत, कोठे राहतात, याचा विचार न करता त्यांच्या पर्यंत हे नवीन तंत्रज्ञान पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत, आणि म्हणूनच आम्ही samsung galaxy A7 हा नवीन फोन तुमच्या पर्यंत पोहचवण्यास उत्सुक आहोत.” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक मधल्या IT आणि mobile Communications चे CEO आणि MD, ‘D J Koh‘ यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here