Samsung Galaxy A9

जगातला पहिला चार कॅमेरा असलेला फोन, ज्यांची भारतातील किंमत 36,990 आणि 39,990 रुपये एवढी आहे. पहिला किंमतीच्या फोन मध्ये 6 GB RAM आहे तर दुसऱ्या किंमतीच्या फोनमध्ये 8 GB RAM आहे. जगातल्या मध्यम किंमतीच्या मोबाईल फोन्स मध्ये आशा प्रकारचं फीचर ऍड करणारी सॅमसंग ही एकमेव कंपनी आहे. या फोन फक्त चार कॅमेऱ्याचा आहे म्हणून महत्त्वाचा नाही तर इतरही फीचर या किंमतीच्या रेंज मधील अन्य मोबाईल फोन्स पेक्षा याच्यात जास्त आहेत.

काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने तीन कॅमेरे असलेला ‘Galaxy A7’ फोन बाजारात आणला होता, तो जगातील पहिला तीन कॅमेराचा स्मार्टफोन ठरला होता. आता सॅमसंगने त्याही पुढे एक पाऊल टाकत चार कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. त्या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A9 असे आहे. हा सुद्धा जगातला पहिला चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन ठरला आहे. Kuala Lumpur (क्वाला लंपूर) मध्ये झालेल्या ग्लोबल लाँच मध्ये या स्मार्टफोनचा लाँच करण्यात आला.

■ Samsung Galaxy A9 स्मार्टफोनचे फीचर्स खालील प्रमाणे –

● गॅलॅक्सी A9 या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.3 inch आहे.

● गॅलॅक्सी A9 स्मार्टफोनमध्ये 6 GB RAM आहे. आणि Snapdragon 660 prosessor आहे.

● या स्मार्टफोनची बॅटरी ही 3800 mAh एवढी आहे.

● या स्मार्टफोनचा Internal Storage 128 GB आहे.

● या स्मार्टफोनला 4 rear Cameras आहेत आणि एक front camera आहे.

● मागच्या चार कॅमेऱ्यापैकी पहिला कॅमेरा हा 24 megapixel resolution आणि autofocus चा आहे.

● त्यातील दुसरा कॅमेरा हा 8 megapixel चा telephoto lens with 2x optical zoom असलेला आहे. Close-ups आणि long फोटोशूटसाठी याचा उपयोग होईल.

● यातील तिसरा कॅमेरा हा ultra-wide lense with scene optimization आणि artificial intelligence-powere scene recognition असलेला आहे.

● चौथा कॅमेरा हा युजर्स साठी आहे, हा 5 megapixel चा कॅमेरा युजर्सना फोटोची depth of field आणि focus manually सेट करता यावी म्हणून चौथा कॅमेरा बसवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here