अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना हे 22 आक्षेपार्ह अँप्लिकेशन्स वापरण्यापासून सावध केलं जातं आहे. काही अँड्रॉईड वापरणाऱ्यांनी ‘clickfraud’ हर अँप्लिकेशन वापरून या गोष्टीचा शोध लावला आहे. हे धोकादायक अँप्लिकेशन्स वापरण्यापासून त्यासाठी मनाई करण्यात येते. Birmingham Live च्या रिपोर्टनुसार ही बातमी समोर आली आहे.

आशा प्रकारच्या तांत्रिक बाबीचा वापर करून गुगल च्या प्ले स्टोअर वर असे अँप्लिकेशन्स कायदेशीर माहिती मिळवण्याचा उत्तम उपाय असल्याचा दावा करतात. याचा परिणाम म्हणून आता काही युजर्सना त्यांच्या फोन मध्ये प्रॉब्लेम दिसायला चालू झाला आहे. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मोठ्या रकमेचे बिल येणे, तुमच्या फोनमधील बॅलन्स उडणे आशा गोष्टींचा समावेश आहे. काहींना त्यांच्या फोनच्या बॅटरीची लाईफ कमी झाल्याचं दिसून आलंय.

Sophos यांनी संशोधन करून आशा अँप्लिकेशन्स ची ओळख पटवली आहे. हे कोणकोणते अँप्लिकेशन्स आहेत आणि ते किती आहेत, त्यांच्यामुळे खर्च नुकसान होतं का ?, अशी सर्व चौकशी Sophos द्वारे करण्यात आली आहे. असे 22 अँप्लिकेशन्स असून हे अँप्लिकेशन्स एकत्रितरीत्या 22 दशलक्ष वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत.

सुरक्षा यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या अँप्लिकेशन्सच्या वापरामुळे युजर्सना सर्वात मोठं जर कोणतं नुकसान होणार असेल तर ते तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात कन्झ्युम करण्यात येतो तसेच तुमच्या मोबाईल फोनच्या बॅटरीची लाईफ सुद्धा कमी होते.

त्या 22 अँप्लिकेशन्सची लिस्ट खाली दिली गेली आहे.

 • Zombie Killer – com.pesrepi.zombiekiller
 • Space Rocket – com.pesrepi.spacerocket
 • Neon Pong – com.pesrepi.neonpong
 • Just Flashlight – app.mobile.justflashlight
 • Table Soccer – com.mobile.tablesoccer
 • Cliff Diver – com.mobile.cliffdiver
 • Box Stack – com.mobile.boxstack
 • Jelly Slice – net.kanmobi.jellyslice
 • AK Blackjack – com.maragona.akblackjack
 • Color Tiles – com.maragona.colortiles
 • Animal Match – com.beacon.animalmatch
 • Roulette Mania – com.beacon.roulettemania
 • HexaFall – com.atry.hexafall
 • HexaBlocks – com.atry.hexablocks
 • PairZap – com.atry.pairza

   

 • या 22 अँप्लिकेशन्स पासून सावध राहा आणि तुमच्या फोनला होणाऱ्या धोक्यापासून वाचवा. युजर्सना ही वॉर्निंग तेंव्हा आली जेंव्हा 140 अँप्लिकेशन्स मध्ये मॅलिशिअस फाईल्स असल्याचं गूगल ने सांगितलं त्याच्या एका महिन्याच्या आत ही सावधान करणारी सूचना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here