Tata Harrier

Tata ची नवीन कार Tata Harrier जानेवारी 2019 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु लाँच होण्या आधीच टाटा ने या नवीन कारच्या मॉडेल वरून पडदा उठवला आहे. लोकांना या नवीन कारची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती.

सर्वांनी 2018 मधील Auto Expo मध्ये टाटांच्या दमदार SUV Tata Harrier चे दर्शन घेतले होते. औपचारिकरीत्या या Auto Expo मध्ये या कार वरून पडदा उठवला होता. टाटा कंपनी आपली ही लोकप्रिय कार लवकरच लाँच करणार आहे. Tata Harrier भारताच्या रोडवर बऱ्याच वेळा टेस्ट करताना पहिली गेली आहे. कंपनी या कारला दोन व्हॅरीएंट मध्ये लाँच करणार आहे, एक 5 सीटर आणि दुसरी 7 सीटर असणार आहे.

Tata Harrier ही कार हुबेहूब टाटांच्या कॉन्सेप्ट कार H5X सारखी दिसते. टाटाने ही कॉन्सेप्ट कार 2018 च्या Auto Expo मध्ये दाखवली होती. Tata Harrier ही टाटांच्या नव्या इम्पॅक्ट डिझाइन 2.0 वर आधारित आहे. Harrier ला कंपनीने बोल्ड लूक दिले आहे.

टाटाने या नव्या कारला अट्रँक्टिव्ह बनवण्यासाठी खूप काम केलं आहे. कार मध्ये तुम्हाला उत्कृष्ट डिझाइन पाहायला मिळेल. अजून तरी कारच्या इंटेरिअर बद्दल माहिती बाहेर आली नाही. कंपनीने कारच्या इंटेरिअरची कोणतीही फोटो बाहेर काढली नाही. कारच्या टॉपवर कंपनी स्पोयलर देऊ शकते.

या कारमध्ये तुम्हाला 2.0 लिटरचा डिझेल इंजिन मिळू शकतं. कंपनी या कारमध्ये 6 स्पीड युनिटचा मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ही देऊ शकते. या उत्कृष्ट फीचर्स नी युक्त असल्यामुळे या कार साठी आधीच प्री-बुकींग केली जात आहे. या कारच टीजर खूप दिवसांपासून दाखवलं जात आहे.

या कारची किंमत 16 लाख ते 21 लाखांच्या दरम्यान असू शकते. लौंचिंगच्या पुढच्या महिन्यापासूनच या कारची डिलीव्हरी दिली जाऊ शकते. या कारच कॉम्पिटिशन ह्युंडाईच्या क्रेटा, महिंद्राची XUV 500, रेनो कॅपचर आणि नवीन निसाण किक्स सोबत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here