आंध्रप्रदेश मध्ये जगातलं पहिलं ‘Thermal Battery Plant’ उभारलं गेलंय. या प्लांटच उद्घाटन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते पार पडल. या थर्मल बॅटरी प्लांट ची मालकी Bharat Energy Storage Technology(BEST) Private Ltd. या कंपनी कडे आहे.

२०१९ च्या मे महिन्यापर्यंत हे प्लांट व्यापारी दृष्टया पूर्णपणे खुलं करण्याच BEST च ध्येय आहे. सुरुवातीला हे प्लांट १००० MW क्षमता असलेल्या बॅटरी तयार करू शकेल. भारतामध्ये डॉ. पॅट्रिक ग्लिन यांनी या तंत्रज्ञानाच पेटंट केलं आहे.

या प्लांटच्या पहिल्या टप्प्यात, टेलिकॉम, मिनी/मायक्रोग्रीड्स आणि इलेक्ट्रिक बस इत्यादी भागाकरिता हे प्लांट थर्मल बॅटरी तयार करणार आहे. आणि असंही सांगितलं जातं आहे की या इलेक्ट्रिक बस एका वेळेच्या चार्ज मध्ये ८००किमी पर्यंतचा प्रवास गाठू शकेल.

BEST आणखीन ध्येय असे आहेत कि, या बॅटरीज तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ९५% वस्तू आणि सामान हे पुनर्वापरास उपलब्द असणार आहे. या बॅटरीज पूर्णपणे कठीण धातू आणि ज्वलनशील पदार्थारहित असणार आहे.

थर्मल बॅटरीजचे फायदे-

१) हे तंत्रज्ञान कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात आणि पर्यावरण समतोल राखण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे.

२) टेलीकंम्युनिकेशन, व्यापारी दृष्टिकोनातून, इलेक्ट्रिक वाहनात, हायवे चार्जिंग स्थानकावर ऊर्जा संरक्षित करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप मदत करणार आहे.

३) सर्वात महत्वाचं म्हणजे हे तंत्रज्ञान दुर्गम भौगोलिक भागात खूप परिणामकारक रित्या वापरता येऊ शकतं.

४) थर्मल बॅटरीज ह्या लिथिउम(Li) बॅटरीज पेक्षाही सर्रास ठरू शकणार आहेत. कारण एकीकडे Li-बॅटरीज ह्या इलेक्ट्रिकल ऊर्जेवर काम करतात तर दुसरीकडे थर्मल बॅटरीज ह्या थर्मल ऊर्जेवर काम करणार आहेत. आणि इलेक्ट्रिकल उर्जेपेक्षा थर्मल ऊर्जा ही सोप्यारीतीने उपलब्द करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here