सध्या मार्केटमध्ये दररोज नववीन स्मार्टफोन लाँच होत आहेत आणि त्यावर मिळणाऱ्या भरपूर डिस्काउंटमुळे बहुतांश लोके हि नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करतात. म्हणून आपणहि जुना फोन बदलून नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात आपल्याला स्मार्टफोन वापरण्यात अडचणी येणार नाहीत.

कॉन्टॅक्ट Sync:

आपल्या फोनमधील कॉन्टॅक्ट हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात त्यामुळे जेंव्हा आपण फोन बदलत असाल तर त्याअगोदर आपले सर्व कॉन्टॅक्ट नंबर हे गुगल अकाउंट वर sync करा म्हणजे जेंव्हा आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करू तेंव्हा गुगल अकाउंट वरून ते कॉन्टॅक्टस तुम्हला भेटतील किंवा जर तुम्ही ते गूगल अकाउंटंट तुमच्या फोनशी संलग्न करताल तेंव्हा सर्व कॉन्टॅक्टस ऑटोमॅटिकली तुमच्या फोनमध्ये जमा होतील.

चॅट हिस्ट्री आणि फोटो बॅकअप :

ट्विटर,फेसबुक इंस्टाग्राम यांसारख ऍप्प्स चॅट हिस्ट्री बॅकअपची गरज भासत नाही. दुसऱ्या स्मार्टफोनवरून हिआपण या ऍप्पल ला लॉगिन करून आपली चॅट हिस्ट्री मिळवू शकता. मात्र, काही ऍप्प्स असेही असतात कि त्याठिकाणी आपल्यला मॅन्युअली मेसेज बॅकअप करावा लागतो. जर आपण व्हाटसऍप्प् वापरत असाल तर फोन बदलण्यापूर्वी आपण चॅट हिस्ट्रीचे बॅकअप निश्चितपणे करा.

त्याचप्रमाणे आपण आपले फोटोस आणि व्हिडिओही क्लाउड्स स्टोरेज वर जतन करू शकता किंवा गुगल सेव हा एक ऍप्प् आहे जो कि तुमचे फोटो ऑटोमॅटीकली sync करून क्लाऊडवर स्टोरेज वर जतन करतो. नंतर ते फोटोस तुम्हाला हवे असल्यास कधीहि डाउनलोड करू शकता.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन:

आपले अकाउंट सुरक्षित राखण्यासाठी यूजर्स नेहमी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करतात. मात्र, फोन बदलताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आपल्याला जुन्या फोनेवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये. तसे पाहिले तर दुसऱ्यास्मार्टफोनवर जीमेल किंवा ऍप्प्वर लॉगिन करण्यासाठी एक गूगल वेरीफिकेशन कोड द्यावा लागतो. हा कोड आपल्या मोबाइलला नंबरवर येतो. जर आपण आपला सिम बदलला असेल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल. अशा स्थितीत मोबाइलला बदलण्याअगोदर गूगल अकाउंट वर जाऊन नंबर ला अपडेट करणे गरजेचे आहे.