TVS Zeppelin

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या Auto Expo 2018 मध्ये अनेक कंपन्यांनी आपापल्या येणाऱ्या गाड्यांचे मॉडेल या Expo मध्ये दाखवले होते. यात TVS ने ही आपले एक उत्कृष्ट नवीन मॉडेल या एक्स्पो मध्ये सर्वांना दाखवले होते. असं म्हटलं जातं होतं की या वर्षी ही बाईक बाजारात विक्री साठी दाखल होईल, पण आता ही बाईक या वर्षी लाँच न होता पुढच्या वर्षी लाँच होणार असल्याच म्हटलं जातं आहे. ही एक क्रुजर बाईक आहे. ही जेवढी दिसायला पावरफुल दिसते, तेवढीच ही बाईक हायटेक सुद्धा आहे. ही कंपनीची पहिली अशी बाईक आहे की ज्यात 220 cc चं पेट्रोल इंजिन असून एक इलेक्ट्रीक मोटर सुद्धा यात बसवलं गेलं आहे.

या बाईक मध्ये 1200 वॅट ची रिजणरेटिव्ह असिस्ट मोटर बसवण्यात आले आहे. ही मोटर 48 व्होल्ट च्या लिथियम आयन बॅटरी सोबत येते. ही बाईक एवढी पावरफुल आहे की त्यात 20% जास्त टॉर्क तयार होते. तरीही कंपनीने हे इंजिन किती पावरफुल आहे, ते किती टॉर्क तयार करते या बद्दल काहीच सांगितलं नाही.

या TVS Zeppelin बाईकच्या लूक बद्दल बोलायचं झालं तर या बाईकला रोबोट फेस असल्यासारखं LED लॅम्प दिलं गेलं आहे, ज्यामुळे बाईक एकदम आकर्षक दिसते. ही बाईक फ्लॅट आणि रुंद आहे. यात हॅलोजन लाईट सारखी लाईट बसवण्यात आले आहे. या बाईक मध्ये मजबूत ऑलॉय व्हील सोबतच ट्युबलेस टायर ही दिले गेले आहेत. कंपनीने बायो नावाचं स्मार्ट अँक्सेस स्विच पण दिल आहे. हे स्विच कशा प्रकारे काम करेल या बद्दल कंपनीने काहीच खुलासा केला नाहीये. या बाईक मध्ये अकॅशन कॅमेरा, क्लाउड कनेक्टिव्हिटी साठीचं इन्फोटेन्मेंट मीटर आणि बाईकला कंट्रोल करण्यासाठी ABS पण दिलं आहे.

TVS Zeppelin

 

काही मीडिया रिपोर्ट नुसार या बाईकची किंमत ही 1.20 लाख ते 1.80 लाख एवढी सांगितली जात आहे. तर अनेक जण असंही सांगतात की याची किंमत 2 लाख ते 3.20 लाख एवढी आहे. जर ह्या बाईकची किंमत 1.2 लाख एवढी असेल तर ही बाईक बजाज अव्हेनजर्स आणि सुझुकी इंट्रूडरला कॉम्पिटीशन देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here