चीनची Vivo ही स्मार्टफोन ब्रँड कंपनी आपल्या नवीन Vivo V9 Pro च्या भारतातील लाँचसाठी सज्ज झाली आहे. असा अंदाज बांधला जातोय की, Vivo V9 pro या मोबाईल फोनची भारतातील किंमत ही 20 हजारापेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच तुम्हाला द्विदशक सहस्त्र रुपये या मोबाईल फोनच्या खरेदीसाठी खर्च करावे लागणार आहेत. थोडे दिवस अगोदरच याच कंपनीने आपले V11 Pro फोन भारतात लाँच केले होते. v11 Pro हा Vivo च्या Artificial Intelligence assistance ‘Jovi’ याच्या सोबत लाँच करण्यात आला.

Vivo V9 Pro या स्मार्टफोनचे फीचर्स –

1) या स्मार्टफोनची स्क्रीन ही 6.4 इंच लांब असून या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर हे 90 % टक्क्यांपर्यंत असणार आहे.

2) या स्मार्टफोनमध्ये 6 GB RAM आणि FHD+ display असणार आहे.

3) यात Qualcomm Snapdragon 660 AIE प्रोसेसर असणार आहे.

4) या फोनमध्ये AMOLED full view display असणार आहे.

5) हा फोन dual-SIM, असणार आहे आणि त्यात 4G VoLTE सपोर्ट सुद्धा असणार आहे.

6) या मोबाईलचा मागील कॅमेरा हा 13 megapixal असून त्याला 2 megapixal चा सेन्सर जोडण्यात आलं आहे.

7) या मोबाईल फोनचा फ्रंट कॅमेरा हा एकटा 12 megapixals चा बसवण्यात आला आहे.

8) या मोबाईल फोनची बॅटरी ही 3260 mAh इतक्या पावरची असणार आहे.

IANS या बातम्या प्रसारण अजेंसीने या स्मार्टफोन बद्दल रिपोर्टिंग केलं आहे, त्यांच्या माहितीनुसार Vivo कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती माध्यमांना सांगितली आहे. लवकरच हा मोबाईल फोन भारतीयांना वापरायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here