Whatsapp Finally Introduced Whatsapp Stickers

व्हॉट्सअप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे लोकप्रिय मेसेजिंग अँप आहे. जगातील जवळपास सर्व स्मार्टफोन धारकाकडे व्हॉट्सअप आहेच. व्हॉट्सअपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं मोठं ब्रँड असताना सुद्धा व्हॉट्सअप ने आतापर्यंत कधीच व्हॉट्सअप स्टिकर्स लाँच केले नव्हते. व्हॉट्सअप शिवाय इतर सर्व मेसेजिंग अँप्लिकेशन्सनी यांच्या आधीच युजर्ससाठी स्टिकर्स जारी केले होते. युजर्ससाठी स्टिकर्स फॅसिलिटी देऊ करणाऱ्या अँप्लिकेशन मध्ये Hike, Facebook Messenger,Viber,Line इत्यादी अँप्लिकेशनचा समावेश आहे.

परंतु आता मात्र व्हॉट्सअपने त्यांच्या युजर्ससाठी स्टिकर्स ची फॅसिलिटी देऊ करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितले आहे की लवकरच तुम्हाला iOS आणि Android मध्ये स्टिकर्स मिळणार आहेत.आणि काही युजर्स म्हणतायत की त्यांना व्हॉट्सअपच्या नवीन अपडेट मध्ये ही स्टिकर्सची सुविधा आलेली आहे.

Text input field मधील नवीन स्टिकर आयकॉन वापरून तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये नव्या स्टिकर्सचा फायदा घेता येणार आहे. या आयकॉन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टिकर्स चा menu उघडला जाईल. तुम्हाला हे स्टिकर्स वापरण्यापूर्वी फेसबुक प्रमाणे आधी तुमच्या आवडीचा स्टिकर पॅक डाउनलोड करावा लागणार आहे, आणि त्यांनंतरच तुम्ही तुम्हाला स्टिकर्सचा वापर करता येणार आहे.

सध्यातरी व्हॉट्सअप डिझायनर कडून आणि अन्य कलाकारांकडून हे स्टिकर्स तयार केले गेले आहेत. व्हॉट्सअप ने android आणि iOS मध्ये थर्ड पार्टी स्टिकर अँप्सला आपला पाठिंबा दर्शवला आहे, ज्यामुळे तुमच्याकडील Google Play Store वरील पब्लिश झालेले स्टिकर पॅक आता युजर्स व्हॉट्सअप मध्ये वापरू शकतील. कंपनीने स्टिकर्स तयार करण्याकरीता गाईड सुद्धा पोस्ट केला आहे.

तुम्ही सुद्धा आपल्या Whatsapp ला उपडेट करून घ्या कदाचित, तुमच्या कडे हा अपडेट आलेला असू शकतो.