Google ने आपल्या Google+ या सोशल मीडिया सर्व्हिसद्वारे मोठ्या प्रमाणात युजर्सचा डेटा चोरीला जात असल्याने Google+ बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. कंपनीच्या निष्काळजीमुळे जवळपास 5 लाख युजर्सचा डेटा एक्सपोज झाल्याने Google ला हे पाऊल उचलावे लागले आहे. सिस्टीम मधील खराबी ज्याला कॉम्पुटर च्या भाषेत आपण bug म्हणतो, त्याला आवर घालण्याच्या प्रयत्नात हा डेटा एक्सपोज झाला आहे.

यावर्षी मार्च महिन्यातच ही घटना घडली आहे परंतु Google+ त्यावेळी या घटनेस सावरण्याचा चांगला प्रयत्न केला होता, परंतु तो बाद ठरला. काल हा bug ला फिक्स करण्यात Google ला यश आले आहे.

कंपनी आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगते की,” Google+ मधील Bug मुळे डेव्हलपर्सना Google+ च्या युजर्सची 2015-18 दरम्यानची संपूर्ण माहिती पाहता आणि वापरता येत होती. या माहिती मध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे, जसं कि प्रोफाइल फोटो, ई-मेल, रिलेशनशिप स्टेटस, जन्म तारीख, तुमचा व्यवसाय, तुम्ही कोठे राहता, ही सर्व माहिती डेव्हलपर्सना मिळत होती. परंतु एवढं होऊन सुद्धा जास्त संवेदनशील माहिती से की तुम्ही पाठवलेले मेसेज, Google+ पोस्ट, मोबाईल मधील फोन नंबर मात्र एक्सपोज झाले नाहीत.”

Google ने या सॉफ्टवेअर bug ला फिक्स केले आहे आणि याच्या झालेल्या परिणामाचा अंदाज सध्या ते बांधत आहे. गूगलने म्हटले आहे की नेमका कोणता युजर्स याचा शिकार झाला आहे हे आम्ही डिटेक्ट करू शकत नाही, कारण या विशिष्ट API साठी फक्त 2 आठवडेच लॉग्ज ओपन होते. Google च्या टीमला असा कोणताही डेव्हलपर सापडला नाही कि ज्याने या माहितीचा उपयोग करून कोणतीतरी ऍक्टिव्हिटी केली.

Google plus ला बंद करत असल्याच्या बातमीवर Google ने म्हटले आहे की, ‘फक्त consumer version येत्या 10 महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2019 पर्यंत बंद करण्यात येईल. या कालावधीत युजर्सना हे version डाउनलोड करण्यास आणि आपला डेटा मायग्रेट करण्याची अनुमती असेल. गुगल सर्विसेसचे Enterprise Version हे कायम राहणार असून लोकांना ते वापरता येणार आहे आणि येत्या काळात त्यात नवीन फीचर्स ही ऍड केले जातील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here