काल सोमवारी अखेर हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे रुळावरून धावली. जर्मनीमध्ये पहिल्यांदा हायड्रोजन पावर्ड ट्रेन हि डीझेल ट्रेनच वर्चस्व संपवत रुळावरून धावली. हायड्रोजन इंधन हे जरी डिझेल पेक्षा जास्त महाग असलं तरी ते पर्यावरण पूरक आहे आणि पर्यावरणाच्या किमतीपुढे हायड्रोजन इंधनाची किंमत काहीच नाही.

फ्रान्सच्या TGV बनवणाऱ्या Alstom या कंपनीने दोन गडद निळ्या रंगाच्या Coradia iLint रेल्वे बनवल्या आहेत. या रेल्वेनी उत्तर जर्मनीतील ‘Cuxhaven-Bremerhaven-Bremervoerde-Buxtehude’ या शहरामार्गे होत 100 किमी अंतर कापून हा इतिहास रचला आहे. यामुळे डिझेल रेल्वे येणाऱ्या काही वर्षात नाहीशा होणार हे मात्र नक्की आहे.

Hydrogen Powered Trains ची वैशिष्ट्ये-

  • जगातली पहिली हायड्रोजन ट्रेन व्यावसायिक सेवेसाठी आणि अशा प्रकारच्या ट्रेन्सच्या निर्मितीसाठी सज्ज आहे. Alstom या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Henri Poupart-Lafarge यांनी उदघाटन समारंभात बोलताना संगीतले की, ‘सामान्य इंधनाप्रमाणे हायड्रोजन इंधनही आता स्टेशनवरच ट्रेन मध्ये भरता येणार आहे.’
  • या हायड्रोजन ट्रेन मध्ये fuel cells बसलेले असणार आहेत, जे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मदतीने विज निर्मिती करणार आहेत. ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यापासून फक्त पाण्याची वाफ आणि पाणीच उत्सर्जित होणार आहे. कसल्याच प्रकारची प्रदूषके हायड्रोजन इंधनापासून तयार होणार नाहीत.
  • जास्तीची तयार वीज ही लिथियम आयन बॅटरिज मध्ये साठवली जाईल, म्हणजे वीज निर्मितीत या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.
  • एक वेळेस हायड्रोजन इंधन टॅंकमध्ये पूर्ण भरल्यानंतर ती ट्रेन 1000 किमी पर्यंतचा प्रवास विनाप्रदूषण करते. डिझेल इंजिनही एका दमात 1000 किमी एवढंच अंतर कापायच पण ते अफाट प्रदूषण करायचं.
  • Alstom कंपनी दावा करत आहे की हे तंत्रज्ञान डिझेल रेल्वेना उत्तम असा पर्याय आणि आतापर्यंतच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here