Berkshire Hathaway या विमा कंपनीचे CEO आणि अध्यक्ष Warren Buffet हे Paytm Parent One 97 communications मध्ये Rs 2000-2500 कोटी गुंतवणूक करणार असल्याच बोललं जातं आहे. Warren Buffet हे जगातले सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते जेथे गुंतवणूक करतील तेथे अनेक कंपन्या गुंतवणूक करणारच. त्यांना ‘Oracle Of Omaha‘ असही संबोधलं जातं. Oracle म्हणजे असा व्यक्ती जो एखाद्या विषयाबद्दल सर्वकाही जाणतो आणि त्या विषयावर सल्ला ही देऊ शकतो. Omaha हे त्यांच्या गावाचं नाव आहे. Forbes च्या यादीनुसार Jeff Bezos आणि Bill Gates नंतर Warren Buffet हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मध्ये आहेत.

भारताच्या नामांकित व्यापारी क्षेत्रातील वृत्तपत्र The Economic Times यांच्या म्हणण्यानुसार, येणाऱ्या काळात Berkshire ही Paytm कंपनी मधील 3-4% मालकी प्राथमिक सदस्यता शेअर्स मार्फत घेणार आहे. यांची गुंतवणूक FDI नसून FII आहे.

FDI म्हणजे काही विशिष्ट वर्षाकारीत, विशिष्ट क्षेत्रात करारानुसार केलेली गुंतवणूक आहे ती अधून मधून काढून घेता येत नाही. FII ही गुंतवणूक विशिष्ट काळाकरिता नसते, ती कितीही दिवस कितीही वर्ष करता येते आणि ती गुंतवणूक कधीही काढून घेता येते.

Paytm अजून पर्यंत कंपनी का झाली नाही ?

होय, Paytm अजून कायद्यानुसार कंपनी झालेली नाही. जर तुम्हाला कंपनी कायद्यानुसार अनुक्रमीत कंपनी व्हायचं असेल तर तुम्हाला सलग तीन वर्षे तुमची कंपनी नफा कमावते आहे असं दाखवावं लागेल. परंतु SEBI च्या आकडेवारीनुसार Paytm ही अजून पर्यंत तोट्यात आहे. 2016-17 मध्ये Paytm चे Rs 899.6 कोटी तोटा झाला होता. आणि Paytm ही अनुक्रमीत कंपनी नसल्यामुळे शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री होत नाही.

सध्या Paytm चं शेअर होल्डिंग –

40 -42 % शेअर्स – Alibaba आणि ANT Financial, China

20 % शेअर्स – Softbank Vision Fund, Japan

16 % शेअर्स – Vijay Shekhar Sharma, India

20 -22 % शेअर्स – SAIF Partners, यांच्याकडे एवढ्या प्रमाणात आहेत.

जर Paytm मार्फत व्यवहार होत राहिले तर Paytm ही Flipkart च्या Phonepay आणि Google च्या Tez ला (GooglePay) चांगल्याप्रकारे टक्कर देऊ शकेल.

येत्या काळात Facebook, Whatsapp आणि Reliance Jio हे सुद्धा Digital Payment Application काढणार आहेत. आणि यांनां जर Paytm ला टक्कर देयची असेल तर लवकरात लवकर paytm ला एक मजबूत कंपनी म्हणून उभरावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here