अल्पवधी काळात यशाच्या शिखरावर पोहचलेली चीनच्या शाओमी कंपनीने भारतात आपले अनेक बजेट फोन लाँच केले आहे. त्यातच आता त्यांनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘शाओमी पोको एफ१’ असं या स्मार्टफोनच नाव आहे. पण हा एक नवीन ब्रँड असून हा शिओमी कंपनीचाच एक भाग आहे.

कंपनी या पोको ब्रँडचे तीन व्हेरिएंट सादर केले आहे. या फोन मध्ये अधिकतम रॅम हा ८ जीबी पर्येंत असणार आहे आणि स्टोरेज बाबतीतही सांगायचे असेल तर याचा इंटर्नल स्टोरेज हा २५६ जीबी पर्येंत जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन ८४५ हा प्रोसेसर असणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन, मूळ व्हेरिएंट २०,९९९ रुपयांमध्ये मध्ये लाँच केला आहे व तसेच मिड रेन्ज व्हेरिएंट हा २३,९९९ मध्ये लाँच केला आहे. त्याचबरोबर आपला टॉप एन्ड व्हेरिएंट हा २८,९९९ रुपयानंमध्ये लाँच केला आहे.

या स्मार्टफोन मध्ये तुम्हला १२ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, या कॅमेरामध्ये AI ची क्षमता आहे. तसेच २० मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. या फोन ची बॅटरी क्षमता हि ४०००mAH ची आहे. जी क्वाल्कम क्विक चार्ज ३.० ला सपोर्ट करते. ६.१८ इंचचा डिस्प्ले या फोन मध्ये मिळणार आहे व तसेच १०८०*२२४६ पिक्सेल चे रिझोल्युशन असणार आहे.

हा फोन आपल्याला २९ ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर अथवा MI च्या अधिकृत संकेतस्थळावरून विकत घेता येईल. तसेच जर तुम्ही हा फोन HDFC च्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड द्वारे विकत घेतला तर १००० रु.चा डिस्काउंट पहिल्या सेल मध्ये मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here