भारताच्या स्मार्टफोन विक्रीचा बादशहा असलेल्या या Xiaomi कंपनीने भारतीय बाजारात आपले पाय आता घट्ट रोवले आहेत. Xiaomi आता रिटेल क्षेत्रात सुद्धा भारतीय बाजारात उतरत आहे. भारतात तब्बल 500 Mi store ओपन करत असळताची माहिती या कंपनीने सांगितली. लहान-लहान शहरात तसेच खेडे गावात सुद्धा Mi store काढणार असल्याचं कळतंय. 2019 पर्यंत हे 5000 रिटेल स्टोअर खुलतील, असा अंदाज सांगण्यात आलाय. आपल्या रिटेल क्षेत्रातील विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कंपनीने ऑक्टोबर 29 ला 500 Mi स्टोअर ओपन केले होते.

Xiaomi ने भारतीय बाजारात 2014 मध्ये ऑनलाइन विक्री वाटेने प्रवेश केला. पण हळू हळू त्यांनी आपले ऑफलाईन उपस्थिती ही वाढवली. Mi चे आधीच शहरी भागात 50 Mi स्टोअर आहेत. त्यांना चीन प्रमाणेच ‘Mi Home Store’ असे नाव देण्यात आले आहे. येथे लोकांना त्यांच्या रेंज मधील प्रत्येक प्रोडक्ट खरेदी करता येते. तसेच भारताच्या मोठ्या शहरात Mi ला प्राधान्याने चालवणारे store पण खूप आहेत.

Mi Home Store आता Xiaomi चा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. येथे Xiaomi असेही प्रॉडक्ट्स दाखवत आहे जे की अजून भारतात लाँच देखील झाले नाहीत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर Xiaomi ची Ninebot Scooter आणि त्याचे Masks. तरीदेखील Xiaomi ला ग्रामीण भागातील या मोठ्या प्रमाणात ओपन करत असलेल्या स्टोअर्स मुळे नव्या संकटांना तोंड द्यावं लागेल. जे स्टार्टर्स आहेत त्यांच्या साठी हे Mi Store हे खूपच लहान असणार आहेत. अगदी सरासरी 300 sq-ft. भारतातील Xiaomi चे मॅनेजिंग डायरेक्टर मनू कुमार जैन यांनी ही सर्व माहिती माध्यमांना सांगितली.

Xiaomi च्या फोन्स ची भारतीय बाजारात खूप मोठी मागणी आहे. कमी किंमतीत त्यांनी लोकांना चांगल्या स्टॅण्डर्ड्स चा फोन पुरवला आहे. लोकांनी याला खूप पसंती दर्शवली आहे. म्हणूनच काही वर्षातच Xiaomi ने भारतीय स्मार्टफोन बाजार पूर्णपणे काबूत ठेवले आहे. तसेच Xiaomi ने उचललेल्या या पाऊलामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही होईल. लोकांना रोजगार मिळेल, चार पैसे मिळतील आणि त्यांच्या जीवनाचा स्तर वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here