जून ते सप्टेंबर हे म्हणणे फक्त पावसाळ्याचे नसून “मोसम मस्ताना चला कुठेतरी भटकायला” असे गाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनात वाजत असणारे महिने आहेत.

पुणे हे मुंबईचे दुहेरी शहर म्हणून ओळखले जाते. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर  शिस्तप्रिय असूनही त्याच्या रम्य वातावरणामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे शहर आहे. मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असत. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो.

विसापूर ला जाण्यास दोन बाजू असले तरी काही छोट्या पायवाटा व दगडांनी बनलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने, किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला चढताना जरी अवघड दिसत असेल, तरीसुद्धा हा फारच मजेशीर आहे. किल्ल्यावर पोहोचताच भुरभुरणारा पाऊस, गार वाऱ्यावर डोलणारी ते हिरवेगार गवत आपल्या स्वागतास सज्ज असतात. किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ लागते,  बाजूलाच दोन गुहा आहेत, गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते.

विसापूर हे शिवरायांच्या स्वरूपात महाराष्ट्राची शान आसून, ही मॉन्सून ट्रेकिंग साठी उत्तम निवड आहे.