जगातील अतिदुर्मिळ अशी ही नाचणाऱ्या हरणाची जात आहे. १९५१ च्या आसपास तर ही हरणाची जात लुप्त होण्याच्या मार्गावर होती पण सध्या ती अस्तित्वात आहे. सध्या यांची संख्या जगभरात फक्त २६० इतकीच आहे. या हरणाची एक पोट जात सुद्धा आहे त्याला सांगाई असे म्हणतात. या हरणाला Brow Antlered Deer किंवा यालाच Dancing Deer सुद्धा म्हणतात. या हरणाच्या ज्या भुवया आहेत त्या थोड्याशा उंचावलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या उंचावलेल्या भुवयावरून त्यांना Brow Antlered हे नाव पडलं. ही हरणाची जात फक्त मणिपूर मध्ये आढळते. मणिपूर मधील लोकटक तलावातच हे हरीण राहतात.

या तलावावर जे फुमुडीझ असतात त्यावर हे हरीण थांबले की दुरून ते डान्स करत असल्यासारखे जाणवतात. परंतु प्रत्यक्षात मात्र ते त्या तलावावरच्या फुमुडीझ वर स्वतः चा तोल सांभाळत असतात.

मणिपूर येथील बिष्णुपुर जिल्ह्यात केईबुल लांमजाव राष्टीय उद्यानात हे लोकटक तलाव आहे आणि या तलावत ह्या हरणाचा वास आहे. हे भारतातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे.

अलीकडच्या काळात या हरणांची संख्या वाढवण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांनी त्यांच्या साठी दुसऱ्या आणखी एक घराचा विचार चालू आहे. थांबुल जिल्ह्यात फुमलेनपट तलावावर यांच्या साठी दुसऱ्या घराच्या निर्मितीचा विचार चालू आहे. परंतु स्थानिक लोक याला विरोध करत आहेत. कारण जर ही हरणं त्या तलावावर राहायला आली तर हे तलावही राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं जाईल आणि त्यामुळे लोकांना या तलावाचा उपयोग करता येणार नाही. बरेचशे स्थानिक या तलावावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत.