भारतातील प्रत्येक किल्ला हा त्याच्या स्वतः मध्ये अनोखा आहे, त्यातीलच गोलकोंडा हा एक किल्ला. हा किल्ला दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी असलेलं शहर, हैद्राबादच्या पश्चिमेला सुमारे 10 किमी अंतरावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी अनेक प्रकारची स्थापत्यशास्त्र शैली वापरली गेली आहे, त्यामध्ये पारशी शैली, तुर्की शैली, इंडो-अफगाण शैली, उत्तर भारत शैली, दक्षिण भारत शैली, अशा अनेक शैली वापरल्या गेलेल्या आहेत, यात हिंदू-इस्लामिक-पारशी स्थापत्य शैली प्रामुख्याने दिसेल. हा किल्ला अतिशय डोंगराळ भागात आणि चारशे फूट उंचीवर बांधला गेला आहे.

या किल्लास आठ मोठमोठे प्रवेश द्वार आहेत. त्या काळातील स्थापत्य शैली हि प्रत्येक अंगाने आणि आपल्या प्रत्येक इंद्रियाशी निगडित अशी प्रगत शैली होती. ह्या किल्ल्याचं डिझाईन फक्त दृश्यमान (visual) होण्याकरताच नव्हे तर ऐकायमान (audiel) होण्याकरता सुद्धा केलं गेलं आहे. ‘बालाहीसार द्वार’ हा सर्वात उंचीवर असलेला किल्ल्याचा भाग आहे.
हा किल्ला शक्तीने किंवा सैन्याबळावर कधीच जिंकला गेला नाही फक्त फितुरी करून औरंजेबाने मात्र हा किल्ला १६८७ मध्ये ८ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर जिंकला होता. शेवटच्या कुतुबशहाला औरंगजेबाने राज कारागृह दौलताबादला कैद केले होते. कुतुबशाही वंश इथे फक्त राज्य करण्याच्या उद्देशाने आलेले नसून ते इथे राहण्याच्या उद्देशाने आले होते. कुचिपुडि नृत्य प्रकार हा कुतुबशहा सुलतानाच्या काळात पुढे आला. त्याकाळातील कुली कुतुबशहा आणि नृत्य कलाकार भागमती यांच्या प्रेमाची चर्च्या अजून सुद्धा त्या भागात ऐकायला मिळते, असंही म्हटलं जातं की भागमतीने कुतुबशहाला कवी बनवलं  होत.  ती या राजाच्या प्रेरणेचे स्रोत बनली आणि प्रेमिका सुद्धा. महम्मद कुतुबशहा ने भागमतीसाठी ती मेल्यावर त्याच किल्ल्यावर मस्जिद उभारली.

गोलकोंडा हा फक्त स्थापत्यासाठीच नाही तर त्याकाळातील मोठया बाजापेठेसाठी सुध्दा प्रसिद्ध होता. हिऱ्यांची मोठी बाजारपेठ इथे होती. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा आपल्याला याच गोलकोंड्याने दिला आहे. कोहिनुर हिरा येथे तयार झाला होता. गोलकोंड्यात आपल्याला दख्खनी चित्रकला आणि रंगकला पाहायला मिळेल.

सर्वजण म्हणतात मेल्यावर सर्वकाही संपत काहीच उरत नाही पण या किल्ल्याने आपल्याला दाखवून दिले आहे की मेल्यानंतर सर्व काही संपत नाही. सुंदरता हि ‘अनंत’ आहे आणि प्रेम हे ‘अमर’ आहे.