Mumbai To Goa Cruise भारतामध्ये क्रूज चा अनुभव ह्या पूर्वी घेता येत नव्हता पण आता ते शक्य झाले आहे.

मुंबई ते गोवा जाणारे भारतातील पहिले समुद्र पर्यटन जहाज सुरु झाले आहे.

या क्रूझलायनर जहाजाचे नाव ‘अँग्रिया’ आहे. हे भारतातील पहिले क्रूझलायनर आहे.

या जहाजाचा पहिला प्रवास २४ आक्टोबर २०१८ ला सुरुवात होणार आहे ज्याची बुकिंग सुरुवात झाली आहे. या जहाजाची बुकिंग करण्यासाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देऊ शकता. मुंबई मधून संध्याकाळी ४ वाजता निघणार आणि गोवा ला सकाळी ९ वाजता पोहचणार असा हा एकून १५ तासांचा आलिशान प्रवास.

ही जहाज कुठल्या मार्गाने जाणार ते पाहू :

mumbai to goa cruise

क्रुज मध्ये एकूण मिळून ११ रूम आहेत.

या जहाजावर वेगवेगळे रूम उपलब्ध आहेत त्यात कपल,लहान मुलांसाठी, जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाणार असाल तर तुमच्यासाठी त्यांच्या कडे सर्वात स्वस्त प्लन आहेत.

रूम भाडे दर :

  • कपल रूम डबल बेड लार्ज विंडो – ७६५० (प्रती व्यक्ती)

 

  • कपल रूम (सोफा, बेड & पोर्ट हॉल ) – ७६५० (प्रती व्यक्ती)

 

  • फॅमिली रूम (डबल बेड, कीड बंक, लार्ज विंडो) – ७२०० (प्रती व्यक्ती)

 

  • बड्डी रूम – (विथ लार्ज विंडो) – ६८०० (प्रती व्यक्ती)

 

  • बंक रूम (४ या त्या पेक्षा जास्त वेक्ती साठी) – ५७०० (प्रती व्यक्ती)

 

  • लक्झरी पोड्स – ४६५० (प्रती व्यक्ती)

 

  • डोर्म्स ( १४/१६/१८ प्रवाशासाठी ) – ४३०० (प्रती व्यक्ती)

टीप : प्रत्येक रूममध्ये तुम्हाला जेवणासाठी २००० (प्रती व्यक्ती) अतिरिक्त द्यावे लागतील.

लक्झरी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील.

mumbai to goa cruise हा क्रुझ अलिशान पद्धतीने बनवण्यात आला आहे . ह्या मध्ये २ हॉटेल्स, ६ बार, लाउंज, आणि जर तुम्ही मसाज मध्ये रुची ठेवत असाल तर एक स्पा सुद्धा आहे.  स्विमिंग पूल आणि फोटोग्राफी साठी ३ ओपन डेक्स बनवण्यात आले आहेत. ह्या मध्ये तुम्ही २५ किलोग्राम इतक्या वजनाचे सामान घेऊन जाऊ शकता.