आपल्या भोवताली असे अनेक लोक असतात ज्यांना फिरण्याबरोबरच खाण्यापिण्याचाही शौक असतो. परंतु बहुतांशवेळा बाहेर कुठे फिरायला गेलात तर तिथे मिळणारे खाद्यपदार्थ आवडतीलचं असे नाही. यामुळे पिकनिकचा मूडच निघून जातो. अशा खाद्यप्रेमींसाठी आपल्या देशात काही खास डेस्टीनेशन आहेत. जिथे तुम्ही फिरण्याबरोबरच विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तर चला पाहूया अश्या कोणती आहेत ती खास डेस्टीनेशन.

नैनिताल 

जर तुम्हांला बोटींग व डोंगर रांगात फिरण्याबरोबरच चमचमीत खाण्याचा शौक आहे. तर नैनीताल तुमच्यासाठी बेस्ट डेस्टीनेशन पर्याय आहे. येथे मिळणारी बाल मिठाई, स्पेशल मोमोज, बटाट्याचे गुटके, गुलगुले एकदम अप्रतिम आहेत.

काय पाहाल…टिफीन टॉप, नैनी पिक, नंदा देवी मंदिर, मॉल रोड, नैनी तलाव, भोवली, भीमताल. अशी काही सुंदर ठिकाणे देखील तिथे तुम्ही पाहू शकता.

जयपूर 

गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर शहर हे खाद्यप्रेमीसाठी नेहमीच आकर्षणचा ठरलेल आहे, जर तुम्हांला इतिहासाची आवड असेल त्याचबरोबर पारंपारिक खाद्यपदार्थांची चव चाखायची असेल तर जयपूरला एकदा नक्कीच भेट द्या. येथील दाल-बाटी चूर्मा, गट्टे ची भाजी, लाल मांस व पापडाच्या भाजीचा नक्की स्वाद घ्या.

काय पाहाल…इतिहासचा वारसा लाभलेल्या या शहरामध्ये पाहण्यासारखी अनेक ऐतिहासीक ठिकाणे आहेत. इतके वर्ष लोटूनहि येतील ऐतिहासिक किल्ले व त्यांचे राजसी सौंदर्य आणखी कायम आहे. त्यामुळे कपलसाठी हे एक बेस्ट डेस्टीनेशन ठरेल.

हैद्राबाद

हैद्राबाद म्हणले कि सर्वप्रथम डोळ्यसोमर दिसतो तो तेथील चारमिनार आणि खमंग बिर्याणी, पण हैदराबाद फक्त चारमिनारसाठी प्रसिद्ध नाही तर येथे मिळणाऱ्या मोगलाई जेवणासाठीही प्रसिद्ध आहे. मोगलाई जेवण, टर्किश व अरेबिक खाद्यपदार्थ, कच्च्या मटनाची बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, कराची बिस्किटं ही हैदराबादची खासियत आहे.

काय पाहाल…रामोजी फिल्मसिटी, बिर्ला मंदिर, चारमिनार, गोलकोंडा, हुसेन सागर हि काही पाहण्यायोग्य प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

कोलकत्ता 

पश्चिम बंगालमधलं कोलकाता म्हणजे मासे शौकीनांच आवडतं शहर. त्यातच जर तुम्हाला मिठाईची आवडत असेल तर कोलकाता तुमच्यासाठी पर्याय आहे. येथे मिळणारी पुचका म्हणजे पाणीपुरी बघितली कि किती खाऊ आणि किती नाही असं तुम्हांला होऊन जाईल. येथे मिळणारे चिकन रोल्स, बिर्याणी देशात दुसरीकडे तुम्हाला कुठेही मिळणार नाही.

काय पाहाल…हावडा ब्रिज, सुंदरबन, व्हिक्टोरिया मेमोरियल, बारा मिनार हि काही तेथील प्रशिध्द ठिकाणे.

मुंबई 

महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबरोबर झणझणीत वडा पाव म्हणजे मुंबईची जान. त्याचबरोबर पारशी डिशेससाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. येथे मिळणारी पाणी पुरीही प्रसिद्ध आहे.

काय पाहाल…गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली दर्गा, नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, वरळी वांद्रे सेतू, मरिन ड्राईव्ह, जूहू समुद्र किनारा, सिद्धिविनायक मंदिर, राणीचा बाग, नॅशनल पार्क, कान्हेरी गुंफा.