अखेर या लोकनेत्याने 17 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या अनेक दिवसांपासून पॅनक्रियाटिक कॅन्सरने ते त्रस्त होते. राजकारणातले अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याला शत् शत् नमन ! पाहुयात त्यांचा जीवन प्रवास.

मनोहर पर्रिकर एक IIT (Metallurgical Eng.) इंजिनिअर होते. 1978 साली त्यांनी IIT मुंबई मधून आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. त्याकाळात IIT इंजिनिअर ची खूप मागणी होती. तरी देखील त्यांनी आपलं आयुष्य एखाद्या कंपनीसाठी व्यय घालवण्यापेक्षा लोकसेवे साठी अर्पण करूणे ज्यास्त योग्य मानलं. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रुजू झाले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली असं म्हणावं लागेल. ते भारतातले पहिले असे विधानसभा सदस्य आहेत ज्यांनी IIT मधून पदवी धारण केली होती.

राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला स्वतःचा ठसा उमटवला. अगदी साधे राहणीमान आणि उच्च विचार ही त्यांची कार्यपध्दती होती. त्यांच्या राहणी मानाबद्दल बोलायचं झालं तर साधा सुती शर्ट आणि पॅन्ट. त्यांनी आतपर्यंत कधीच सूट-बूट घालून स्वतःला मिरवलं नाही. मुळात त्यांना ते कधी पटलंच नाही. पायात सुद्धा साधी हवाई चप्पल घालणं ते पसंत करायचे.

मुख्यमंत्र्यांना किंवा केंद्रीय मंत्र्यांना जसा आपल्या अवती भोवती लवाजमा लागतो, तसा ताफा आपल्या सोबत असणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी देऊन ठेवली होती. गोव्यात आपल्या घरून ऑफिस कडे जाण्यासाठी ते आपली ऍक्टिवा स्कुटर चा उपयोग करायचे. अनेकदा ते रस्त्यावरच्या सिग्नलवर सर्वसामान्यप्रामाणे वाट पाहताना सुद्धा बघितले गेले आहेत. सर्वसामान्यप्रामाणे ते रस्त्याच्या कडेने गाड्यावर जेवत असताना पाहिले गेले आहेत. मनोहर पर्रिकर एक निखळ व्यक्तित्व होतं. त्यांच्या नावावर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. एक राजकारणी कसा असावा, याचं उत्तम उदाहरण ते भारताला, नव्हे नव्हे जगाला देऊन ते गेले.

गोव्याचे ते तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची कार्यतत्परता पाहून 2014 मध्ये मोदी सरकारने त्यांना केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून गोव्याहून दिल्लीला बोलुवून घेतलं. परंतु 2017 मध्ये जेंव्हा गोव्यात निवडणुका झाल्या त्यावेळी मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होणार या अटीवर मित्र पक्षांनी सोबत येण्याचं ठरवलं. त्यामुळे पुन्हा ते 2017 मध्ये मुख्यमंत्री झाले.

मोदींसोबत मनोहर पर्रिकरांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते.

मनोहर पर्रिकर एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्याचा विरोधी सुद्धा सन्मान करतात. त्यांचा द्वेषी तुम्हाला कुठे मिळणार नाही. तरुणांचे चाहते, असे हे व्यक्तिमत्त्व आज या जगात राहिलं नाही. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारताला खूप मोठं राजकीय नुकसान झालं आहे.

लोकनेता मनोहर पर्रीकरांना मनःपूर्वक आदरांजली !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here