महाराष्ट्राचे मौल्यवान रत्न आणि या युगाचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती अनोख्या पद्धतीने निलंगा तालुक्यात साजरी करण्यात आली. महाराजांनी ज्या कौशल्याने हे स्वराज्य स्थापन केलं, महाराजांच्या त्या कौशल्यापासून आपण चांगल्या प्रकारे परिचित आहोत. त्यांच्या युक्तीने, राजकीय डावपेचाणे आणि प्रशासकीय कारभाराने ते शक्य झाले. त्यांच्यामुळेच पुढे महान मराठा साम्राज्य स्थापन झाले. या महान राजाची लोक 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, वेगवेगळे सांस्कृतिक दृश्य आणि देखावे दाखवले जातात, पोवाडे गायले जातात,तलवार बाजी, लठ्ठबाजी आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि रॅली काढल्या जातात. शिवाजी महाराजांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.

असाच प्रयत्न निलंगा तालुक्यात एक अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी करून करण्यात आला. या ठिकाणी आयोजकांनी विचार केला की शिवजयंती साजरी तर करूच पण त्यातून लोकांपर्यंत काहीतरी संदेश गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे वन्य जीव, झाडे-झुडपे आणि जंगले यांच्याशी कशाप्रकारची होती?, पिण्याच्या पाण्याची सुयोग्य व्यवस्था राजांनी कशी केली होती ? हा जरी संदेश गेला तरी आपण जगासाठी खूप काही करू शकलो, हे निश्चित. आयोजकांनी 2 लाख 40 हजार चौ.किमी. क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर हरित शिव-प्रतिमेची उभारणी केली. ही शिव-प्रतिमा अळीव बिया वापरून त्यांची पेरणी करून साकार करण्यात आली. या कामात अनेक स्वयंसेवकानी अथक परिश्रम घेतले. या अळीव बियांना पाणी देण्यासाठी अत्याधुनिक पाणी वाटप पद्धत वापरण्यात आली. तिला मायक्रो स्प्रे होज(Micro-Spray hose) असे म्हणतात. 10 दिवसांच्या अथक प्रयत्नांनी स्वयंसेवकांनी ही हरित शिव-प्रतिमा साकार करून दाखवली. या तंत्रज्ञाचा वापर करण्या पाठीमागचा हेतू हा की, लोकांना, गोरगरिबांना शेतकऱ्यांना त्याची ओळख व्हावी आणि कमी पाण्यात सुद्धा कशाप्रकारे अधिक उत्पन्न आपण घेऊ शकतो, हे लक्षात आणून देण्याचा होता. पाणी कमी असताना संपूर्ण लातूर हरित राहू शकतो, हा संदेश पोहचवण्याचा मूळ उद्देश होता.

10 दिवसांनी ही शिवप्रतिमा संपूर्ण जगासाठी खुली करण्यात आली. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या शिव-प्रतिमेची दखल घेतली आणि लोकांना विंनती केली त्यांनी तेथे जरूर जावे आणि ही हरित शिव-प्रतिमा पाहण्याचा लाभ आणि आंनद घ्यावा. या हरित शिवप्रतिमेच्या पब्लिसिटी साठी जे पंप्लेट्स तयार करण्यात आले होते ते ही खूप अनोखे आणि पर्यावरण पूरक होते. त्या कागदामध्ये तुळशीच्या बियांचा वापर करण्यात आला होता. जर तो कागद माती आणि पाण्याच्या संपर्कात आला तर त्यातून एका नवीन तुळशीच्या रोपट्याचा जन्म होईल. तुळशीचे रोपटे हे आपल्या संस्कृतीत खूपच पवित्र मानले जाते.

या प्रतिमेचा शिल्पकार मंगेश निप्पाणीकर नावाचा तरुण होता. तो अशाच मोठमोठ्या शिवप्रतिमा साकार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याआधी ही त्याने लातुरात रांगोळीचा वापर करून भव्यदिव्य शिवप्रतिमा साकार केली होती. त्यावेळी ही संपूर्ण महाराष्ट्राने त्याची दखल घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here