केंद्रीय गृह मंत्रालयाने ATM मध्ये पैसे भरण्यासाठी नवीन नियमावली तयार केली. ही नियमावली सामान्य ग्राहकांसाठी नसून सरकारी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. ATM मधील चोरी, लूट, दरोड्या पासून बचाव करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीनुसार-

8 फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण भारतातील कोणत्याही ATM मध्ये रात्री 9:00 pm च्यानंतर, संध्याकाळी 6:00 pm च्यानंतर आणि दुपारी 4:00 pm च्यानंतर पैसे भरले जाऊ नये असे स्पष्ट बजावले आहे. या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी लागू होतील.

1) शहरी भागातील ATM मध्ये रात्री 9:00 pm च्यानंतर पैसे भरले जाणार नाही.

2) ग्रामीण भागातील ATM मध्ये संध्याकाळी 6:00 pm च्यानंतर पैसे भरले जाणार नाहीत.

3) आणि जो भाग नक्सल प्रभावी आहे, त्याभागातील ATM मध्ये दुपारी 4:00 pm च्यानंतर पैसे भरले जाऊ नये.

मानक कार्यप्रणालीनुसार-

● पैसे भरण्याकरिता रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये दर ट्रिप 5 कोटी पेक्षा जास्त रक्कम असू नये
● भारतामध्ये अशा 8000 खाजगी गाड्याद्वारे ATM मध्ये पैसे भरले जातात.

ATM बद्दल काही मनोरंजक माहिती –

■ जगातलं पहिलं ATM हे इंग्लंड मधील ‘लंडन’ शहरात, 27 जून 1967 साली सुरू झालं.

■ भारतामध्ये ATM पहिल्यांदा HSBC बँकेने 1987 साली सुरू केले.
HongKong and Shanghai Banking Corporation म्हणजे HSBC बँकेने हे ATM मुंबई शहरात अंधेरी ईस्ट येथे सुरू केले होते.