ठाणे :कार्यक्रमाला सोबत येऊ का ? असे विचारल्याने संतापलेल्या पतीने आपल्या डॉक्टर पत्नीवर चक्क गरम चहाचा कप फेकल्याचा प्रकार रविवारी सकाळी ठाणे येथील वर्तकनगर येथे घडला.

मिहीर रणनवरे असे आरोपी पतीचे नाव असून पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात ठाणे येथील वर्तकनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला हि डॉक्टर असून रविवारी सकाळी पती चहा पीत असताना कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत तिने विचारल्यावर राग आल्याने पतीने गरम चहाचा कप फेकून मारला.त्यामुळे पत्नीच्या अंगावर चट्टे उठले. त्यानंतरही पतीने मुलांना आणि पत्नीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here