टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अशा रिऍलिटी शो बिग बॉस मुळे आत्तापर्यंत बऱ्याच जणांचे आयुष्य संपूर्ण पालटून गेलं आहे. बिग बॉस मध्ये सहभागी झालेले स्पर्धक या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या बिग बॉस चे १३ वे पर्व सुरु असून बॉलिवूड चे मिस्टर दबंग सलमान खान या शो चे निवेदन करत आहे. सलमान खान मुळे एक वेगळं वलय या शो ला प्राप्त झाले आहे. हा शो कलर्स टीव्ही या वाहिनीवर प्रसारित होत असून त्याचा टीआरपी सध्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

यापूर्वी सुद्धा बिग बॉस अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. बिग बॉसच्या मागील पर्वा पर्यंत लोणावळा येथील घरावरून खूप वाद निर्माण झाले होते. याशिवाय गेल्या वर्षी प्रसिद्ध गायक अनुप जलोटा हे बिग बॉस मध्ये सहभागी झाले होते. त्यांनतर वेगळ्याच कारणांसाठी ते चर्चेत राहिले. असा हा बिग बॉस शो एखाद्याला चर्चेत राहायचं असेल तर एक चांगलं व्यासपीठ आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

भरपूर भांडणे, कुरबुरी आणि गॉसिप्स यामुळे सध्या बिग बॉस १३ मधील स्पर्धक अभिनेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा सर्वांचा आवडता स्पर्धक झाला आहे. बालिका वधू या मालिकेसाठी प्रसिद्ध असणारा हा अभिनेता चांगल्या आणि वाईट अशा दोनी कारणांसाठी फेमस झालाय.
याशिवाय बिग बॉस मधील आणखी एक स्पर्धक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. तो आहे प्रसिद्ध मॉडेल असीम रियाझ. असीम रियाझ ने बिग बॉस यामध्ये दिलेल्या परफॉर्मन्स मुळे अल्पावधीतच त्याचा एक चाहता वर्ग तयार झाला आहे. आणि यामुळेच सध्या असीम चे नाव विजेतेपदाच्या शर्यती या मध्ये असणाऱ्या स्पर्धकांमध्ये घेतले जातेय.

पण आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस मध्ये येण्यापूर्वी असीम रियाझ हा काही टीव्ही जाहिराती आणि वरून धवन च्या एका हिंदी चित्रपटात दिसला होता. 

२०१४ साली आलेल्या वरूण धवन, इलियना डिक्रुझ आणि नर्गिस फाखरी यांनी अभिनय केलेला बॉलिवूड मधील सुपरहिट चित्रपट ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटात असीम रियाझ ने  काम केले आहे. चित्रपटात असीम ने वरून धवन च्या कॉलेजमधील मित्राची भूमिका केली होती. चित्रपटात वरुण धवनला इलियाना डिक्रुझ सोबत प्रेम होताना दाखवले आहे. यामुळे चिडलेला असीम वरुण धवनसोबत मारामारी करतो. चित्रपटातील एका प्रसंगात असीम रियाझ हा वरुण धवनच्या मागे धावताना दिसतोय.

चित्रपटातील या प्रसंगाची एक छोटीशी क्लिप सध्या सगळीकडे चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये वरुण धवन असीम रियाझला चांगलाच चोप देतोय. सध्या सोशल मीडियावर या क्लिपचीच जास्त चर्चा आहे.

सध्या असीम रियाझ बिग बॉस हा खेळ अत्यंत चांगल्या पध्द्तीने खेळत आहे. बिग बॉस मधील इतर स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, शेहनाज गिल, पारस छाब्रा यांच्यासोबत असीम रियाझचे वारंवार खटके उडत आहेत. यामुळे असीमचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. याशिवाय बिग बॉसचे जेतेपद जिंकण्यासाठी असीम चांगलेच प्रयत्न करताना दिसतोय. बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या इतर सर्वच स्पर्धकांना असीमने आपण विजेतेपदाचे दावेदार आहोत हा संदेश दिलेला आहे. आपण ही स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळतोय हेही असीम स्पष्ट करतोय.

याशिवाय असीम सध्या त्याचं प्रेम हिमांशी खुराना हिच्या मुळे सुद्धा असीम सध्या हेडलाईन्स गाजवतोय. असीमने याआधीच आपण हिमांशीवर प्रेम करत असल्याचे जाहीर केलं आहे, यासाठी ज्या एका अभिनेता-गायक याचा हिमांशी सोबत साखरपुडा झालाय याने असीमला वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे इथून पुढे हे पाहायला मजा येणार आहे, कि खरोखरच असीम हिमांशी वर प्रेम करतो … कि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि बिग बॉस मध्ये जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी त्याने हा एक स्टंट केला आहे.