गुजरात सचिवालयात सोमवारी पहाटे बिबट्याच्या घुसखोरी मुळे सचिवालय परिसरात खळबळ उडाली होती. ही बातमी कळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी त्या बिबट्याचे सचिवालय परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. खूप वेळ गेल्यानंतर 10 तासांनी पोलिसांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बिबट्या आता या परिसरातुन बाहेर पडला आहे, पण तो कधी बाहेर पडला, कोठून बाहेर पडला हे मात्र सर्च ऑपरेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगता आलं नाही. परंतु बिबट्या बाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये पाहिलं गेलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वन विभागाने सांगितले की, त्या बिबट्याला शोधायला 300 तर 350 कर्मचारी सचिवालय परिसरात दाखल होते. विधानसभा आणि सचिवालय परिसरात जागोजागी पिंजरे ठेवून हे सर्च ऑपरेशन पार पाडण्यात आलं. या परिसरातील 130 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. वन विभागाने सांगितले की बिबट्याच्या भीतीने येथे अधिकाऱ्यांच्या प्रवेशावर रोख लावली आहे. अधिकारीच नसल्यामुळे कंकच पुर्णतः ठप्प झाले आहे. सध्यातरी विधानसभा आणि सचिवालयात अधिकाऱ्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

माहितीनुसार सचिवालयाची बिल्डिंग ही विधानसभेला लागूनच उभी आहे. या परिसरात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव याना धरून एकूण 14 कार्यालय आहेत. तसेच काही दूर अंतरावर मुख्यमंत्र्या बरोबरच काही मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे आवास स्थान ही जवळच आहे. या ठिकाणी खार, मोर आणि कुत्र्यांची संख्या खूप जास्त आहे. रात्री सुमारे 1.53 वाजता रोड सर्कल वरून हा बिबट्या सचिवालयाच्या गेट नंबर-7 मधून आत घुसला. गेट नंबर-7 च्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या बिबट्याची घुसखोरी कैद झाली आहे. गेट वरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली.

या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून लगेचच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी आपल्या हत्यारांसोबत घटनास्थळी दाखल झाले आणि आपल्या कामाला अंजाम दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here