महाराष्ट्रातील ठाणे जिल्यात दाखल झाली पेट्रोल आणि डिझेल विना चालणारी कार. ही कार इलेक्ट्रिक कार असून हि कर  8 ते 10 तास चार्जिंग केल्यानंतर 150 किलोमीटर धावते.

ठाण्यातील अविनाश निमोणकार या उद्योजकाने ही ई-कार विकत घेतली आहे.  हि कार महिंद्रा कंपनीची असून या कारची किंमत 10 ते 11 लाख इतकी आहे. या गाडीला हिरव्या रंगाचे नंबर प्लेट असेल. हि कार एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर दीडशे किलोमीटर धावते. या गाडीमुळे कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

  • सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांना सबसिडी दिली आहे, या गाडीसाठी तुम्हाला कसलाही रोड टॅक्स भरावा लागत नाही.
  • या गाडीच मेंटेनन्स खूपच कमी आहे. ही गाडी संपूर्णतः ऑटोमॅटिक असून, यात गिअर नाही, क्लच नाही, ऑइलच टेन्शन नाही.
  • या गाडीसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून दोन ते अडीच लाखाचं अनुदान देतात. या गाडीला नोंदणी शुल्क सुद्धा लागत नाही.
  • DC फास्ट चार्जिंग स्टेशनवर फक्त 45 मिनिटात ही गाडी फुल चार्ज होते.
  • उतरण असताना किंवा ब्रेक लावल्यावर हि कार आपोआप चार्जिंग होत असते, म्हणजे हि गाडी चालत असताना स्वतः चार्ज पण होते.

जगभरात प्रदूषणाने थैमान घातल्यापासून पासून ई-कार कडे आता लोकांची मागणी खूप वाढत आहे. लोक जागरूक होत आहेत. त्यांचे इनकम सुद्धा वाढले असल्यामुळे एवढ्या किंमतीची कार कोणीही उच्च मध्यम वर्गीय सहज घेऊ शकतो. सरकार अशा ई-कार साठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करत आहे. येत्या काळात सगळीकडे ई-कार दिसतीलच, कारण ती आता काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here