महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात. आपल्या बिनधास व्यक्तिमत्वामुळे आणि कणखर निर्णय क्षमतेमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आपल्या फॅन्सना आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर रिप्लाय करत असतात. जर त्यांना त्या व्यक्तीच्या कौशल्य दिसलं तर ते त्याला नौकरी किंवा आवश्यक साधने गिफ्ट म्हणून सुद्धा देतात. त्यांच्या आशा गोष्टी सर्वांना परिचित आहेत. असे कामे करून सर्वांची मने आनंद महिंद्रा जिंकतात.

यावेळेस ही अशीच एक घटना घडली आहे. नीरज प्रताप सिंह नावाच्या एका ट्विटर युजरने आनंद महिंद्राच्या ट्विटला कमेंट करत असताना एका रिक्षाची फोटो पोस्ट केली आणि त्याला पाहताच आनंद महिंद्रा त्या रिक्षा चालकाचे फॅन झाले. त्याने त्याच्या रिक्षाला महिंद्राचा लोगो लावला होता. त्याला पाहूनच आनंद महिंद्रा प्रभावित झाले. त्याला नवीन गाडी घेऊन देण्याचं वचन सुद्धा आनंद महिंद्रानी दिलं.

Mahindra Logo

Image Credit – Twitter

नीरज प्रताप सिंह याला तो उलटा लावलेला लोगो ही मजेदार गोष्ट वाटली. परंतु आनंद महिंद्रानी त्याला रिप्लाय करून सांगितलं की,

“मला वाटत तुम्हाला ती गोष्ट मजेदार वाटत असेल नीरज आणि ते आहे सुद्धा, खास करून तो उलटा लावलेला लोगो. परंतु मी याला पाहून खूपच प्रभावीत झालो आहे, कारण हा रिक्षा चालक आपल्या ब्रँडला महत्वाकांक्षी रूपात पाहतो, त्यामुळे आपण त्याला तो जीवनात प्रगती करत असल्यामुळे नवीन आणि सुधारित वाहन घेऊन देऊ…”

आनंद महिंद्रानी पुन्हा एकदा या कृतीतून संपूर्ण भारतीयांचं मन जिंकलं आहे. आनंद महिंद्राच्या याच गुणांमुळे तर तरुण वर्ग त्यांचा मोठ्याप्रमाणात फॅन आहे.