धोकादायक आणि जीवघेणी आव्हाने इंटरनेट वर चालूच असतात,ब्लू व्हेल गेम मुळे झालेल्या मृत्यूनंमुळे मोमो गेम नी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

खरेतर मोमो गेम ला आपण गेम म्हणत असलो तरी हा गेमिंग अँप नाही ,तर हा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे .हा खेळ व्हाट्सअँपवर एका विशिष्ट नंबरवरून सुरु होतो ज्यात मुलीचे मोठे डोळे व मोठे तोंड असलेला विचित्र आणि त्रासदायक चेहरा दिसतो .ब्लू व्हेल प्रमाणे हा गेम देखील लहान मुलांना आणि तरुणांना टार्गेट करतो .

सुरुवातीला त्या नंबरवरून तो विचित्र चेहरा पाठवला जातो त्यानंतर अश्याच प्रकारचे हिंसक फोटो पाठवले जातात आणि ब्लु व व्हेलप्रमाणे आत्मघाती प्रवर्तीकडे वळतो .

ह्या गोष्टीचा शोध पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हि प्रतिमा जपानी कलाकार “मीदोरी ह्याशी” निर्मित आहे ,परंतु त्याचा ह्या गेम शी काहीही संबंध नसल्याचे समोर आले .ह्या विशिष्ट्य अहवानामुळे अर्जेंटिना मध्ये १२ वर्ष्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे सायबर क्राईमनी आपल्या मुलाना ह्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.